Madhura Velankar: आयुष्याला हटके लायटिंग करणाऱ्या 'बटरफ्लाय'चा टीझर प्रदर्शित, मधुरा वेलणकर दिसणार नव्या भूमिकेत

फ्रेश आणि कलरफुल अशा 'बटरफ्लाय' चित्रपटाची त्याच्या टीजरमुळे कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.
Madhura Welankar New Film
Madhura Welankar New FilmInstagram/ @madhurawelankarsatam

Butterfly Teaser: जाहिरात, चित्रपट, नाटक, टीव्ही मालिका अशा विविध क्षेत्रात काम केल्यानंतर मीरा वेलणकर आता चित्रपट दिग्दर्शनात पाऊल टाकत आहेत. तिचा 'बटरफ्लाय' या चित्रपटाचा टीजर लाँच करण्यात आला असून, ५ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. अत्यंत फ्रेश आणि कलरफुल अशा या चित्रपटाविषयी या टीजरमुळे कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.

Madhura Welankar New Film
Shah Rukh Khan: नेटकऱ्यानं शाहरुखला दिली थेट एफआयआरची धमकी , किंग खानने गुन्हा मान्य करत मागितली माफी; नेमकं काय आहे प्रकरण?

मीरा वेलणकरने आतापर्यंत अनेक नामांकित जाहिरात संस्थांमध्ये काम केलं आहे. तिच्या जाहिरातींनी अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कारही पटकावले आहेत. त्याशिवाय त्यांनी मराठी रंगभूमीवर नटसम्राट, तू तर चाफेकळी, लव्हस्टोरी, आय अॅम नॉट बाजीराव अशा नाटकांमध्ये अभिनय केला आहे.

Madhura Welankar New Film
Malaika Arora: खरंच की काय ? मलायकाचं दुसरं लग्न ? साखरपुड्याबद्दलचं 'ते' ट्विट चर्चेत

पिंपळपान, बंधन, पंखांची सावली या मालिकेंमध्ये मुख्य भूमिका केल्या असून प्रेमाची गोष्ट या चित्रपटात अभिनय केला आहे. तर लव्हस्टोरी, मिस्टर अँड मिसेस, फिर से हनिमून या नाटकांसाठी वेशभूषेची जबाबदारी निभावली होती. वेगवेगळ्या माध्यमात चतुरस्र काम केल्यानंतर आता 'बटरफ्लाय' या चित्रपटाचं मधुराने पहिल्यांदाच दिग्दर्शन केलं आहे.

Madhura Welankar New Film
Hera Pheri 3: पुन्हा होणार हास्याचा धमाका..! बाबूभैय्या, राजू आणि श्यामच्या 'हेरा फेरी ३'च्या शूटिंगला सुरुवात

अभिनेत्री मधुरा वेलणकर साटम आणि अभिजित साटम यांच्या अप्रोग्रॅम स्टुडिओजनं 'बटरफ्लाय' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात मधुरा वेलणकर साटम, अभिजित साटम, प्रदीप वेलणकर, महेश मांजरेकर, राधा धारणे, सोनिया परचुरे अशी उत्तम स्टारकास्ट आहे. विभावरी देशपांडे ह्यांची कथा असून कल्याणी पाठारे आणि आदित्य इंगळे यांनी चित्रपटाची संवाद लिहिले आहेत. प्रत्येकाच्या मनातल्या फुलपाखराची गोष्ट या चित्रपटातून उलगडण्यात आली आहे. ५ मे रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com