Disha Vakani Spotted With Family Instagram
मनोरंजन बातम्या

Disha Wakani Video: मालिका सोडल्यानंतर दयाबेन पहिल्यांदाच कॅमेऱ्यात झाली स्पॉट, ५ वर्षांनंतर अभिनेत्रीला पाहून चाहते आनंदित

Disha Wakani News: फारशी कॅमेऱ्यासमोर न येणारी दिशा वाकानी नवरात्रीनिमित्त पापाराझींच्या कॅमेऱ्यामध्ये स्पॉट झाली.

Chetan Bodke

Disha Vakani Spotted With Family

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मध्ये दयाबेन परतणार अशी चर्चा होत आहे पण अद्याप मालिकेमध्ये दिशा वाकानीची एन्ट्री झालेली नाही. नेहमीच चाहते दया भाभी पुन्हा मालिकेमध्ये कधी दिसणार? असा प्रश्न उपस्थित करीत आहेत. सध्या सर्वत्र नवरात्रीची धुम सुरू आहे. फारशी कॅमेऱ्यासमोर न येणारी दिशा वाकानी नवरात्रीनिमित्त पापाराझींच्या कॅमेऱ्यामध्ये स्पॉट झाली. अभिनेत्री नुकतीच एका गरबा पंडालमध्ये सहभागी झाली होती. यादरम्यानचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अभिनयातून ब्रेक घेतलेल्या दिशाला पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सूक आहेत. दिशा वाकानी खरंतर फारशी सोशल मीडियावर सक्रिय नसते. नुकतंच दिशाने एका गरबा कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी दिशा, तिच्यासोबत पती, मुलांनी कार्यक्रमाला हजेरी लावली होती. सध्या त्या कार्यक्रमातले अनेक व्हिडीओज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. ‘फिल्मीग्यान’ या पापाराझी चॅनलने तिच्या काही व्हिडीओ शेअर केल्या आहेत. यावेळी अभिनेत्रीने गोल्डन रंगाचा लेहेंगा, त्यावर गुलाबी रंगाची ओढणी परिधान केली आहे. न्यूड मेकअप करत अभिनेत्रीने आपला लूक पुर्ण केला होता.

अनेक वर्षांच्या मोठ्या गॅपने दिशा कॅमेऱ्यामध्ये स्पॉट झाल्यामुळे चाहते फारच आनंदित झाले आहेत. देवीच्या दर्शनावेळी अभिनेत्रीने सर्वांसोबत हसून खेळून गप्पा देखील मारल्या. व्हायरल व्हिडीओमध्ये, दिशा, तिचा पती मयुर आणि त्यांची मुलंहीसोबत दिसत आहेत. मयुर आणि दिशाने आपल्या मुलांसोबत दर्शन घेतले आहे. अभिनेत्रीला सोशल मीडियाच्या माध्यमातून मालिकेमध्ये पुन्हा परत ये, अशी विनंती केली जात आहे. कायमच अभिनेत्रीच्या साध्या लूकचे आणि तिच्या निखळ सौंदर्याच्या चर्चा होतात. यावेळी ही पुन्हा एकदा तिच्या साधेपणाचं कौतुक केलं जात आहे.

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेविषयी सांगायचे तर, मालिकेमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून दया भाभी परतणार अशी चर्चा होत आहे. शोला 15 वर्षे यशस्वी पूर्ण झाल्याबद्दल, निर्मात्यांनी दया परणार अशी घोषणा केली. मात्र नंतर याबाबत कोणतीही माहिती प्रेक्षकांना मिळाली नाही. त्यामुळे आता दिशा वाकानी मालिकेमध्ये कधी परतणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : शिंदे गटाला मोठा झटका, मोठ्या नेत्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Maharashtra Live News Update: राधाकृष्ण विखे पाटील मनोज जरांगे यांच्या भेटीला अंतरवाली सराटीत दाखल

Khare Shankarpali Recipe : यंदा दिवाळीला खास बनवा खुसखुशीत खारी शंकरपाळी, फक्त १० मिनिटांत रेसिपी तयार

Crime News : मामाच्या मुलीचा लग्नाला नकार, तरुण कमालीचा संतापला, चवताळलेल्या भावानं बाजारपेठेतच रक्तरंजित खेळ केला

WPL: आयपीएल ऑक्शनमध्ये मोठा बदल; खेळाडू रिटेनबाबत BCCIनं फ्रँचायझींना पाठवली गाइडलाइन

SCROLL FOR NEXT