Kajal Pisal's career on stake because of her Audition TMKOC Saam Tv
मनोरंजन बातम्या

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: दयाबेनने 'या' अभिनेत्रीचे करियर संपवले, मालिकेच्या निर्मात्यांवर काजलचे गंभीर आरोप

काही दिवसांपूर्वी काजल पिसाळ हिने दयाबेनच्या भूमिकेसाठी ऑडिशन दिले होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Kajal Pisal On Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: 'तारक मेहता का उलटा चश्मा' ही टीव्ही जगतातील प्रसिद्ध विनोदी मालिका आहे. या मालिकेसह या मालिकेतील पात्रही खूप प्रसिद्ध आहेत. या मालिकेतील प्रत्येक पात्राची वेगळी ओळख आहे. त्यामुळे एखादे पात्र साकारणारा कलाकार बदलला तर प्रेक्षकांना हा बदल पचवणे कठीण जाते. तसेच याचा परिणाम कार्यक्रमाच्या लोकप्रियतेवर होतो. असेच काहीसे सध्या घडताना पाहायला मिळत आहे.

दयाबेन म्हणजेच दिशा वकानी हिने मालिकेतून एक्झिट घेतल्यापासून चाहते बरेच नाराज आहते. तसेच तिच्या परतण्याची वाट पाहत आहते. ती परत येणार आहे की नाही हे अद्याप स्पष्ट नसले तरी निर्मात्यांनी दिशाचा या बदल्यात भूमिकेसाठी दुसऱ्या अभिनेत्रीला घेण्याचे ठरवले आहे. त्यासाठी काही दिवसांपूर्वी काजल पिसाळ हिने दयाबेनच्या भूमिकेसाठी ऑडिशन दिले होते.

काजल पिसाळ 'साथ निभाना साथिया', 'बडे अच्छे लगते है' या मालिकेतून ती दिसली होती. तिने 'सिर्फ तुम' या मालिकेत शेवटचे काम केले होते. त्यामुळे तिने 'तारक मेहता का उठला चश्मा' या मालिकेतील दयाबेनच्या भूमिकेसाठी ऑडिशन दिले होते. जेव्हा याबद्दल इंडस्ट्रीत कळले तेव्हापासून तिला कोणताच दुसरा प्रोजेक्ट मिळत नसल्याचे काजलने सांगितले आहे. बरेच प्रयत्न करून देखील तिला नवीन काम मिळत नसल्याने काजल निराश आहे. (Actress)

माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत काजल पिसाळने सांगितले की, "मी दयाबेनच्या भूमिकेसाठी ऑडिशन दिली होती पण बरेच दिवस वाट पाहूनही मला त्यांचा कॉल आला नाही. त्यानंतर मला माझे सिलेक्शन झालेले नाही असे समजले. पण काही प्रॉडक्शन हाऊसना असे वाटत आहे की मी दयाबेनची भूमिका साकारणार आहे. त्यामुळे मला नव्या प्रोजेक्ट्ससाठी कोणीच विचारणा करत नाही. मी ऑगस्टमध्ये या भूमिकेसाठी ऑडिशन दिली होती. मी याआधी त्याबद्दल बोलले नाही कारण मी फक्त ऑडिशन दिली होती. मी वाट पाहत राहिले की निर्मात्यांकडून काहीतरी उत्तर येईल पण त्यांच्याकडून मला अद्याप कोणतेही उत्तर आलेले नाही.” (Media)

“अनेक प्रोडक्शन हाऊस आणि कास्टिंग डायरेक्टर्सना वाटते की मी ‘तारक मेहता’मध्ये दयाबेनची भूमिका साकारणार आहे, त्यामुळे ते कामासाठी मला विचारणा करत नाहीत. त्यांनी मला फोन करून विचारले की मी ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ साइन केला आहे का? तेव्हा मला हे सर्व समजलं. त्यामुळे मला हे स्पष्ट करायचे आहे की ऑडिशन देऊनही ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’च्या निर्मात्यांनी मला संपर्क केला नाही. या ऑडिशनमुळे माझ्या करियरवर परिणाम झाला आहे. या ऑडिशनचा माझ्या करिअरला फटका बसला आहे.”

दिशा वकानीने 2017 मध्ये मॅटर्निटी लिव्हवर गेली होती. तिच्या पुनरागमनाविषयी तसेच नवीन दयाबेनबद्दल अनेक बातम्या समोर येत आहते. यासगळ्यात तिने तिने तिच्या दुसरे मूल झाले त्यामुळे तिची सुट्टी अजून लांबली. दिशेने मानधन वाढविण्याची मागणी गेल्यामुळे तिचे पुनरागमन थांबले आहे. निर्मात्यांनी हे दावे फेटाळले होते. अलीकडेच निर्मात्यांनी शोसाठी दयाबेनच्या ऑडिशन सुरुवात केली आहे. (Disha Vakani)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Garlic Peeling: लसूण सोलण्यासाठी घरच्या घरी वापरता येतील अशा सोप्या पद्धती

Hair Care: केसांचे नुकसान टाळायचंय? मग 'या' गोष्टी आजपासूनच बंद करा

Sun Transit 2025: आजपासून या राशींचं नशीब पालटणार; 12 वर्षांनी सूर्य करणार गुरुच्या नक्षत्रात प्रवेश

Sunday Horoscope : भगवान विठ्ठलाची उपासना लाभदायी ठरेल; ५ राशींच्या लोकांचा दिवस आनंदी जाणार

Maharashtra Politics : राज्याचं राजकीय समीकरण बदललं, 'ठाकरे'च विरोधी पक्षाचा चेहरा? VIDEO

SCROLL FOR NEXT