India Lockdown: इफ्फीमध्ये 'इंडिया लॉकडाऊन'चा होणार वर्ल्ड प्रिमियर, चित्रपटाच्या शिरपेचात मानाचा तुरा

इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (IFFI) या पुरस्कारात मधु भांडारकर दिग्दर्शित 'इंडिया लॉकडाऊन' चित्रपटाचा वर्ल्ड प्रिमियर होणार आहे.
India Lockdown Poster
India Lockdown PosterSaam Tv
Published On

India Lockdown world premiere at IFFI 2022: मधु भांडारकर दिग्दर्शित 'इंडिया लॉकडाऊन' हा चित्रपट येत्या 2 डिसेंबर रोजी, झी ५ (Zee 5) वर प्रदर्शित होत आहे. येत्या आगामी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (IFFI)मध्ये चित्रपटाचा वर्ल्ड प्रिमियर होणार आहे. हा महोत्सव येत्या २० नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर या दिवसात पणजी, गोवा येथे पार पडणार आहे. दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या 'इंडिया लॉकडाऊन' चित्रपटाची कथा सत्य घटनेवर आधारित आहे.

मार्च २०२० मध्ये संपूर्ण जगावर वैश्विक कोरोना महामारीचे महासंकट आले होते, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे भारत सरकारने अचानक २१ दिवसांसाठी टाळेबंदी घोषित केली होती. त्यानंतर प्रत्येक नागरिकाची चांगलीच दाणादाण उडाली होती. शहरातील अनेक कामगार हाती काम नसल्याने पायी चालत आपल्या गावाकडे परतत होते.

त्यांना तिथे पोहोचण्यासाठी कुठल्याही प्रकारची व्यवस्था करण्यात आली नव्हती. त्या काळात घडलेल्या अशा अनेक भीषण घटनांवर चित्रपट भाष्य करण्यात आले आहे. दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी बॉलिवूडच्या प्रेक्षकांना 'चांदनी बार', 'ट्रॅफिक सिग्नल' आणि 'फॅशन' सारखे हिट आणि आपल्या सभोवतालचे वास्तव दाखवणारे चित्रपट त्यांनी प्रेक्षकांना दिले आहे.

'जगभरातील कुठल्याही प्रेक्षकाला हा चित्रपट आपलासा वाटणारा आहे. खरंतर कोरोनाने प्रत्येकाला एकत्र आणले आणि पहिल्यापेक्षा सर्वाधिक कणखर बनवले. अशा पद्धतीने संपूर्ण कारभार ठप्प होईल याचा विचारही कधी आपण केला नव्हता. त्यामुळे त्या काळातील ताण-तणाव, अनिश्चितता हे थोड्याफार प्रमाणात जगभरातील नागरिकांनी अनुभवले होते.

हे या चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. टाळेबंदीतच जन्माला आलेला हा चित्रपट इफ्फी महोत्सवात जगभरातून आलेल्या चित्रपटप्रेमींना दाखवण्यात येणार यासारखा आनंद नाही.' अशी भावना दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी व्यक्त केली. या चित्रपटात प्रतिक बब्बर, सई ताम्हणकर, श्वेता बसू प्रसाद, प्रकाश बेलावाडी आणि आहाना कुमरा हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

ZEE5 इंडियाचे चीफ बिझनेस ऑफिसर मनीष कालरा चित्रपटाच्या प्रिमियरविषयी सांगतात, 'आम्ही IFFI येथे 'इंडिया लॉकडाऊन' वर्ल्ड प्रीमियरमध्ये चित्रपटप्रेमींच्या पहिल्या प्रतिक्रिया मिळविण्यासाठी उत्सुक आहेत, कारण भारतातील लोकांवर कोविड महामारीचे परिणाम दाखविण्याचा हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे.' PEN स्टुडिओज, भांडारकर एंटरटेनमेंट आणि प्रणव जैन यांच्या पीजे मोशन पिक्चर्सचे जयंतीलाल गडा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

"इंडिया लॉकडाऊन" व्यतिरिक्त, विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित "द काश्मीर फाईल्स", एसएस राजामौलीचा "RRR", मराठी चित्रपट "धरमवीर", आणि बंगाली चित्रपट "टॉनिक" देखील महोत्सवात प्रदर्शित केले जातील. चारही चित्रपट ZEE5 वर प्रवाहित होत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com