Gurucharan Singh Police Got His Last Location Saam Tv
मनोरंजन बातम्या

Gurucharan Singh Missing Case : 'तारक मेहता...' फेम सोढीचं शेवटचं लोकेशन सापडलं; बेपत्ता झाल्यावर ३ दिवस ‘इथं’ मुक्काम, एटीएममधून पैसे काढले अन्…

Guru Charan Singh News : 'तारक मेहता...' फेम सोढीचं शेवटचे लोकेशन समोर आले असून त्याने शेवटचे एटीएममधून काही पैसे काढल्याची माहिती समोर आली आहे.

Chetan Bodke

Gurucharan Singh Police Got His Last Location

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेमध्ये रोशनसिंग सोढीची भूमिका साकारणारा अभिनेता गुरुचरण सिंग गेल्या एक आठवड्यापासून बेपत्ता झाला आहे. २२ एप्रिलला तो घरातून दिल्ली विमानतळावर जाण्यासाठी बाहेर पडला होता. पण तो मुंबईला पोहोचला नाही आणि घरीही परतला नाही. आता या घटनेमध्ये नवीन अपडेट समोर आलेली आहे.

दरम्यान, अभिनेत्याचे शेवटचे लोकेशन समोर आले असून त्याने शेवटचे एटीएममधून काही पैसे काढल्याची माहिती समोर आली आहे. अभिनेत्याने एटीएममधून पैसे कोणत्या कारणामुळे काढले आहेत ? याचा खुलासा पोलिस सध्या करीत आहे. (Televesion Actor)

गुरुचरण सिंह बेपत्ता असल्याचे वृत्त २६ एप्रिलला समोर आले होते. अभिनेता गुरुचरण सिंगचे वडील हरगीत सिंग यांनी इंडिया टुडेसोबत बोलताना सांगितले की, "मी २२ एप्रिलपासून गुरुचरण सिंग बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली आहे. दिल्लीतील पालम पोलिस स्थानकांत तो बेपत्ता झाल्याची तक्रार दिली असून पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहेत."

पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, गुरुचरण मुंबईला जाणार होता, त्याची २२ एप्रिलला रात्री साडेआठ वाजताची फ्लाइट होती, पण तो विमानतळावर गेलाच नाही. तो दिल्लीतील पालमसह इतर भागात पाठीवर बॅग घेऊन चालत फिरताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. याचबरोबर त्याने दिल्लीतल्या एका एटीएममधून सात हजार रुपये काढले होते. (Delhi Police)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुचरण सिंह २४ एप्रिलपर्यंत दिल्लीत होता. त्यानंतर त्याचा मोबाईल स्विच ऑफ झाला. २४ तारखेला घरापासून २ ते ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या एका ठिकाणी तो उपस्थित असल्याचे हे स्पष्ट झाले आहे. तपासादरम्यान, गुरूचरण सिंह लग्नही करण्याच्या तयारीत होता. तर दुसरीकडे तो आर्थिक चणचणीचाही सामना करीत होता. या सर्व गोष्टींमध्ये गुरुचरण अचानक गायब झाल्यामुळे सध्या अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah)

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुचरण सिंगची आई गेल्या अनेक दिवसांपासून आजारी असल्यामुळे रुग्णालयात दाखल होती. गुरूचरण सिंहच्या वडीलांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्याच्या आईची प्रकृती व्यवस्थित असून सध्या घरी त्या विश्रांती घेत आहे. सात दिवसांपासून बेपत्ता झालेला गुरुचरण सुखरूप परत यावा, यासाठी चाहत्यांसह त्याचे कुटुंबीय आणि त्याचे मित्रमंडळी प्रार्थना करत आहेत. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Premachi Goshta 2: एका लव्ह स्टोरीच्या अरेंज मॅरेजची गोष्ट; ‘प्रेमाची गोष्ट २’ चा हटके टीझर प्रदर्शित!

Beetroot Rice Recipe : चायनिज कशाला? घरीच करा बीटाचा चमचमीत राईस

थरारक! कोसळलेल्या पुलावरून विद्यार्थ्यांचा जावघेणा प्रवास; VIDEO पाहून अंगावर शहारे येतील

Shivali Parab Saree Look: 'ओल्या सांजवेळी उन्हे सावलीस बिलगावी...' हिरव्या साडीतलं शिवालीचं सौंदर्य पाहून हेच म्हणाल...

Maharashtra Live News Update : मागाठाणे बस डेपोतील कंत्राटी बस चालक संपावर

SCROLL FOR NEXT