Swara Bhaskar Dimple Yadav x
मनोरंजन बातम्या

Swara Bhaskar : मला डिंपल यादववर क्रश आहे, सगळे bisexual आहोत; स्वरा भास्करचं वक्तव्य, VIDEO

Swara Bhaskar Interview : अभिनेत्री स्वरा भास्कर तिच्या पतीसह एका मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाली होती. या कार्यक्रमामध्ये केलेल्या वक्तव्यामुळे स्वरा भास्करला प्रचंड ट्रोल केले जात आहे.

Yash Shirke

  • अभिनेत्री स्वरा भास्करने एका मुलाखतीत खळबळजनक विधान केले.

  • खासदार डिंपल यादव यांच्यावर मला क्रश आहे, असेही तिने स्पष्टपणे म्हटले.

  • या वक्तव्यामुळे स्वरा आणि तिचा पती फहाद अहमद ट्रोल होत आहेत.

Swara Bhaskar Statement : बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर तिच्या वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध आहे. नुकताच एका मुलाखतीमध्ये स्वरा भास्करने खळबळजनक विधान केले. आपण सगळे उभयलिंगी म्हणजेच Bisexual आहोत, आपल्यावर विषमलैंगिकता (Hetrosexuality) समाजाने आपल्यावर लादली आहे, असे स्वराने म्हटले आहे. तिने समाजवादी पक्षाच्या खासदार डिंपल यादव यांच्यावर मला क्रश आहे, असेही मुलाखतीत म्हटले आहे.

स्वरा भास्कर आणि तिचा पती फहाद अहमद यांनी द इंडियन एक्स्प्रेसच्या स्क्रीन या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते. 'जर लोकांना विचार करायचे, वागण्याचे स्वातंत्र्य दिले, तर आपण प्रत्यक्षात बायसेक्शुअल आहोत. आपण तसेच वागू. हेटेरोसेक्शुअल ही एक विचारसणी आहे, जी हजारो वर्षांपासून आपल्यावर लादली गेली आहे. मानवजातीची प्रगती करण्यासाठी ही विचारसरणी मान्य करणे आवश्यक होते', असे स्वरा भास्करने स्क्रीनच्या मुलाखतीत म्हटले.

मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीने मस्करीमध्ये फहाद अहमद यांना कान बंद करायला सांगितले आणि स्वराला 'असं कोणी आहे का ज्याच्यावर तुम्हाला क्रश आहे?' असा प्रश्न विचारला. तेव्हा प्रश्नाचे उत्तर देताना स्वरा म्हणाली, 'मला डिंपल यादव यांच्यावर खूप मोठा क्रश आहे.' डिंपल यादव या समाजवादी पक्षाच्या खासदार आणि उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या पत्नी आहेत.

स्वरा भास्कर आणि फहाद अहमद यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी फहाद आणि स्वरा दोघांनाही प्रचंड ट्रोल केले आहे. व्हिडीओच्या कमेंट बॉक्समध्ये असंख्य नकारात्मक कमेंट पाहायला मिळत आहे. काहींना स्वराच्या विधानाचा संबंध तिच्या राजकीय आकांक्षांशी जोडला आहे. समाजवादी पक्षात तिकीट मिळवण्याचा स्वरा भास्कर प्रयत्न करत असल्याचे काही यूजर्संनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Winners List : बिग बॉस सीझन 1 ते 19; कोण कोण ठरलं BB ट्रॉफीचे मानकरी? पाहा विजेत्यांची यादी

Bigg Boss 19 Winner Gaurav Khanna : पहिल्या नजरेत प्रेम! ९ वर्षांचा संसार; फिल्मी स्टाइल प्रपोज, वाचा गौरव खन्नाची प्यारवाली लव्हस्टोरी

Bigg Boss 19 Winner: गौरव खन्नाने उचलली 'बिग बॉस 19'ची ट्रॉफी; फरहाना भट्टला दिली मात

Bigg Boss 19 - Pranit More : 'बिग बॉस १९' चे घर गाजवणाऱ्या महाराष्ट्रीयन भाऊची संपत्ती किती?

Pranit More Struggle Journey : दादरची चाळ ते बिग बॉसचे घर कसा होता प्रणित मोरेचा संघर्षमय प्रवास? वाचा महाराष्ट्रीयन भाऊची कहाणी

SCROLL FOR NEXT