Dadar Abhimaan Geet Song Out Instagram
मनोरंजन बातम्या

Dadar Abhimaan Geet Song Out: राज ठाकरे यांच्या हस्ते दादरचे पहिलेवहिले अभिमान गीत प्रेक्षकांच्या भेटीला

Dadar Abhimaan Geet Song Shared On Social Media: दादरच्या सांस्कृतिक वैभवाची ओळख नव्या पिढीला नव्याने करून देता यावी यासाठी “दादर अभिमान गीत” तयार केले आहे, नुकतेच हे गीत राज ठाकरे यांच्या हस्ते सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Dadar Abhimaan Geet Song Out Raj Thackeray: दादर ही एक संस्कृती आहे. दादर ही केवळ दादरमध्ये वास्तव्य करणाऱ्या लोकांसाठीच नव्हे तर प्रत्येक मराठी माणसाची जननी आहे. सण, उत्सव, सभा, सिनेमा, नाटक आणि खरेदी ह्यांचे पूर्वपरंपार मराठमोळे माहेरघर म्हणजेच आपले दादर. दादरमधील सांस्कृतिक वारसा, दादरच्या सांस्कृतिक वैभवाची ओळख नव्या पिढीला नव्याने करून देता यावी यासाठी दादर येथील नव्या दमाच्या प्रणिल हातिसकर या तरुणाने “दादर अभिमान गीत” तयार केले आहे, नुकतेच हे गीत राज ठाकरे यांच्या हस्ते सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आले.

“दादर अभिमान गीत” ह्या गाण्यात दादरचा प्रवास तीन पिढयांच्या माध्यमातून उलगडण्याचा प्रयत्न प्रणिलने केला असून प्रणिल हातिसकरने निर्मिती, दिग्दर्शन, गायन,लेखन अशी सगळीच महत्वाची धुरा त्याने सांभाळली आहे. अभिनेता सुयश टिळक, सिनेनाट्य अभिनेत्री प्रिया मराठे तसेच जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर व जेष्ठ अभिनेत्री उज्वला जोग ह्यांनी ह्या गाण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावल्या आहेत.

मूळात अवघं आयुष्य दादरभोवती फिरत असलं की तुम्हाला दादरकर हा शिक्का लागतो. विद्यार्थी म्हणून बालपण बालमोहन विद्यामंदिरमध्ये गेलं त्यामुळे शिवाजी पार्कचा निकटचा संबंध आणि म्हणूनच पार्कला फेरफटका मारल्याशिवाय दिवस पूर्ण होत नाही. (Mumbai)

दादरच्या वलयात वाढल्यामुळे दादरची संस्कृती अंगवळणी पडली, मूळात आपल्या मराठी माणसाचे,संस्कृतीचे दादर हे माहेरघरच.म्हणूनच सामान्य माणसाची खोली जरी १० बाय १० ची असेल तरी वास्तव्य मात्र राजमहालासारखं, ह्या दादरचा सामान्य माणसाचा प्रदीर्घ प्रवास, त्रेधातिरपीट हे वेगळ्या शैलीत व्यक्त व्हावं असा हट्ट होता, आणि त्यातूनच दादर विषयीच्या लेखणीतून दादर अभिमान गीताने आपसूकच जन्म घेतला असल्याचे निर्माता, दिग्दर्शक प्रणिल हातिसकरने सांगितले (Entertainment News)

“दादर अभिमान गीत” नव्याकोऱ्या प्रणिल आर्ट्स ह्या युट्युब चॅनेलवर प्रदर्शित करण्यात आले आहे. गाण्याचे उत्तम गीत लेखन, कलाकारांचा साजेसा सुंदर अभिनय त्यामुळे गाण्याला चारचाँद लागले आहेत. ह्या गीताला बृहन्मुंबई महानगरपालिकेने सुद्धा खंबीर पाठिंबा दर्शवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विजेचा धक्का लागून बिहारच्या तरुण मजुराचा दुर्दैवी मृत्यू

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबाराचा प्रयत्न करणारा कोण? हल्लेखोर इंजिनीअरचे NASA कनेक्शन उघड

Raghav Chadha: राघव चड्ढा अन् परिणीतीच्या दिल्लीतील आलिशान घराचे फोटो व्हायरल

Samruddhi Mahamarg accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; वाहनाचा टायर फुटला अन्...VIDEO

Kidney Failure Symptoms: किडनी फेल होण्यापूर्वी शरीर देतं 5 संकेत, वेळीच द्या लक्ष

SCROLL FOR NEXT