TMKOC Actress Career : 'तारक मेहता का उल्टा चश्मा' हा टीव्हीवरील लोकप्रिय शो आहे. गेली १५ वर्ष हा कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. कार्यक्रमातील माधवी भाभी म्हणजेच सोनालिका जोशीचं आयुष्य या कार्यक्रमाने बदलून टाकलं आहे.सोनालिकाने आपल्या करिअरची सुरवात मराठीतून केली होती. या कार्यक्रमामुळे ती घराघरात पोचली.
'तारक मेहता का उल्टा चश्मा' हा कार्यक्रम जगभर पहिला जातो. या कार्यक्रमाची लोकप्रियता अधिकाधिक वाढत आहे. या कार्यक्रमाची चर्चा ही विशेषत: कार्यक्रमातील पात्रांमुळे होत असते. प्रत्येक पात्र हे प्रेक्षकांच्या घरातील भाग झाले आहे. प्रत्येक पात्राची एक वेगळीच गम्मत आहे. प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. यातीलच एक पात्र म्हणजे माधवी भाभी.
गोकुलधाम सोसायटीची आचार पापड राणी म्हणून प्रसिद्ध असलेल्या माधवी भाभीचा म्हणजे सोनालिका जोशीचा आज ४७ वा वाढदिवस. तिच्या करिअरमधील १५ वर्षे ती तारक मेहता का उल्टा चश्मा या कार्यक्रमाची भाग आहे. सोनालिका ही सोशल मीडियावरही सक्रिय असते. (Latest Entertainment News)
सोनालिका जोशीचे करिअर
सोनालिकाचा जन्म ५जून १९७६ ला महाराष्ट्रात झाला. अॅक्टिंगमध्ये करिअर करण्याआधी तिने मुंबई युनिव्हर्सिटीमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं. नंतर तिने मराठी थिएटरपासून अॅक्टिंग करिअरला सुरवात केली.
२००६ साली तिने वारस सरेच सरस या मराठी चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. त्यानंतर तिने काही मराठी मालिकाही केल्या. तारक मेहता का उल्टा चश्मा या कार्यक्रमातून तिने प्रेक्षकांच्या मनात छाप सोडली आहे.
गोकुलधाम सोसायटीतील सेक्रेटरी आत्माराम तुकाराम भिडेची बायको हे पात्र अत्यंत उत्तमरित्या पार पाडत आहे. मालिकेच्या पहिल्या भागापासून ती कार्यक्रमाशी जोडली गेली आहे. या कार्यक्रमाने १५ वर्षाच्या कालखंडात अनेक पात्र आली-गेली, बदलली देखील.
कार्यक्रमाची सुरवात २००८ साली झाली. शोच्या पहिल्या दिवसांपासूनच सोनालिका कार्यक्रमात दिसत आहे. या काळात अनेक कलाकारांनी मालिका सोडली पण सोनालिका कार्यक्रमाशी अजुनही जोडलेली आहे. प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात सोनालिका कसलीच कसर सोडत नाही. (Serial)
तिच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायच तर सोनालिकाच्या नवऱ्याच नाव समीर जोशी आहे. त्यांना एक लहान मुलगी आहे. त्यांचे लग्न २००४मध्ये झाले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.