Aarya 3 Shooting Wrap Up Instagram
मनोरंजन बातम्या

Aarya 3 Shooting Wrap Up: सुष्मिता सेनच्या आगामी ‘आर्या ३’ चं शूटिंग आटोपलं, अभिनेत्रीने शेअर केला सेटवरील सुंदर व्हिडीओ...

Sushmita Sen Wraps The Shoot Of Aarya 3: सुष्मिता काही दिवसांपूर्वी आजारी असल्याने शूटिंगला काही दिवसांसाठी ब्रेक लागला होता. नुकतेच अभिनेत्रीने दिलेल्या माहितीनुसार, वेबसीरिजचे शूटिंग संपल्याची माहिती मिळाली आहे.

Chetan Bodke

Sushmita Sen Shares Happy Video From Last Day Shoot: बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनच्या ‘आर्या’ सीरिजचे दोन्ही सीझन OTT प्लॅटफॉर्मवर प्रचंड हिट ठरले. गेल्या काही दिवसांपुर्वी सीरिजच्या तिसऱ्या भागाचा टीझर प्रदर्शित झाला होता. गेल्या काही महिन्यांपासून वेबसीरिजची शूटिंग सुरू होती. अखेर आता वेबसीरिजची शूटिंग पूर्ण झाली असल्याची माहिती मिळाली आहे. अभिनेत्रीला गेल्या काही दिवसांपूर्वी हार्ट ॲटॅक आला होता. त्यामुळे शूटिंगला काही दिवसांसाठी ब्रेक लागला होता. नुकतेच अभिनेत्रीने दिलेल्या माहितीनुसार, वेबसीरिजचे शूटिंग संपल्याची माहिती दिली आहे.

सुष्मिताने शेअर केलेल्या व्हिडीओत, तिच्या आनंदाला पारावार उरलेला दिसत नाही. ‘आर्या ३’ चे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर सुष्मिताने सेटवरील एक सुंदर व्हिडीओ शेअर केला असून तिने शूटिंग पुर्ण झाल्याची माहिती दिली आहे. व्हिडिओमध्ये, सुष्मिता सेन कुर्ता-पायजमा परिधान केलेली आणि शाल गुंडाळलेली दिसत आहे. व्हिडिओमध्ये सुष्मिता खूप आनंदी दिसत आहे. ती आधी सिकंदर खेरला मिठी मारते आणि नंतर दिग्दर्शक राम माधवानीसोबत नाचताना दिसत आहे. (Bollywood Film)

व्हिडिओ शेअर करत सुष्मिताने सोशल मीडियावर शूटिंग पूर्ण झाल्याची माहिती दिली आहे. कॅप्शनमध्ये अभिनेत्रीने लिहिले की, “ ‘आर्या ३’ चे शूटिंग पूर्ण झाले आहे. अप्रतिम कलाकार आणि क्रू सोबत काम केले. आर्या ३ च्या फॅमिलीचे आभार. दौलत खूप छान. मी तुझ्यावर प्रेम करते.' सुष्मिता सेनच्या या पोस्टवर चाहत्यांकडून अनेक कमेंट येत असून सुष्मिताच्या या आगामी वेबसीरिज चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. (OTT)

चाहत्यांना सुष्मिता सेनचा हा व्हिडीओ खूप आवडला असून तिला चाहत्यांनी वेबसीरिजसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सुष्मिता हृदयविकाराच्या झटक्यातून बरी झाली असून अँजिओप्लास्टी केल्यानंतर तिने ‘आर्या ३’ च्या सेटवरून तलवार चालवतानाचा व्हिडिओ शेअर केला. तो व्हिडीओ पाहून चाहत्यांमध्येही उत्साह संचारला होता. (Bollywood Actress)

‘आर्या ३’चे पहिले दोन्हीही सीझन सुपरहिट झाले होते. यामध्ये सुष्मिता सेन, चंद्रचूड सिंग आणि सिकंदर खेर या त्रिकुटाला चांगला प्रतिसाद मिळाला. ‘आर्या ३’ कधी रिलीज होणार, त्याची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र चाहते त्यासाठी उत्सुक आहेत. या वेब सीरिजशिवाय सुष्मिता सेन 'ताली'मध्ये दिसणार आहे. यामध्ये ती सामाजिक कार्यकर्त्या गौरी सावंतची भूमिकेत दिसणार आहे. (Web Series)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT