Kartik Aaryan And Kiara Advani Film Trailer: ‘शहजादा’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरल्यानंतर कार्तिक आर्यनचा (Kartik Aaryan) आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कार्तिकच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘सत्यप्रेम की कथा’ (Satyaprem Ki Katha) असे असून आज नुकताच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
‘सत्यप्रेम की कथा’चे दिग्दर्शन समीर विद्वंसने केले आहे. चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियादवाला, शरीन मंत्री केडिया आणि किशोर अरोरा यांनी संयुक्तपणे निर्मित केला आहे. चित्रपटात कार्तिक आर्यनसोबत कियारा अडवाणीदेखील दिसणार आहे. चित्रपट येत्या २९ जूनला प्रदर्शित होणार असून सध्या चित्रपटाची सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरू आहे.
ट्रेलरच्या सुरूवातीला आर्यन आणि कियारा दिसत असून ट्रेलरची सुरूवात एक सुंदर गाण्याने होते. कियाराला आधीपासूनच एक बॉयफ्रेंड असतो, पण तरीही कार्तिक तिच्या प्रेमात पडतो. जरीही तिला आधीच बॉयफ्रेंड असला तरी, ती त्यांच्या रिलेशनसाठी तयार होते. दोघांची लव्हस्टोरी सुरू होते. कौटुंबिक मनोरंजन असलेल्या चित्रपटात इथून खरा ट्वीस्ट येतो. चित्रपटात प्रेम, इमोशन, ड्रामा, रोमान्स हे चित्रपटात पाहायला मिळणार आहे. चित्रपटात नेमकं काय घडणार हे पाहण्यासाठी तुम्हाला २९ जूनची वाट पाहावी लागेल. (Bollywood Film)
ट्रेलरपूर्वी, निर्मात्यांनी ‘सत्यप्रेम की कथा’चे नवीन पोस्टर रिलीज केले होते. तेव्हापासून चित्रपटाची सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरू आहे. अखेर चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सर्वांनाच चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. चित्रपटात कार्तिक आणि कियारा व्यतिरिक्त गजराज राव आणि सुप्रिया पाठक सारखे स्टार्स देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी दुसऱ्यांदा एकत्र स्क्रीन शेअर करत आहेत. यापूर्वी दोघांनी ‘भूल भुलैया 2’ मध्ये एकत्र काम केले होते. तेव्हापासून चाहत्यांना त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री आवडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कार्तिकचा कबीर खानसोबत एक चित्रपट आहे. दुसरीकडे कियाराबद्दल बोलायचे झाले तर, तिचा एक तेलुगु चित्रपट ‘गेम चेंजर’ आहे. ती राम चरणसोबत चित्रपटात दिसणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.