Taali Motion Poster Instagram @sushmitasen47
मनोरंजन बातम्या

Taali Motion Poster: 'लाख गिरा दे बिजली मुझपे...'; सुष्मिताच्या ‘ताली’ वेबसीरिजचा जबरदस्त मोशन पोस्टर चर्चेत

Taali New Motion Poster Shared: लोकप्रिय तृतीयपंथीय आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी सावंत यांच्या जीवनावर आधारित ‘ताली’ या वेब सीरिजचा मोशन पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे.

Chetan Bodke

Taali Motion Poster Shared: सुष्मिता सेनने सुमारे तीन दशकांपूर्वी ‘मिस युनिवर्स’ (Miss Universe) हा किताब जिंकला होता. तिच्या सौंदर्याने, रुबाबाने आणि प्रभावी अभिनय कौशल्याने तिने लाखो मने जिंकली. आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने घायाळ करणाऱ्या सुष्मिताची लवकरच एक नवीन वेबसीरिज येणार आहे. लोकप्रिय तृतीयपंथीय आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी सावंत यांच्या जीवनावर आधारित ‘ताली’ वेबसीरिजमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या वेब सीरिजचा मोशन पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे.

एका तृतीयपंथीयाच्या आयुष्यातील संघर्ष, त्यांचं म्हणणं जगासमोर मांडणाऱ्या गौरी सावंतचं नाव महाराष्ट्रातील घराघरात प्रसिद्ध आहे. ‘ताली’ या वेबसीरिजमध्ये गौरी सावंतची भूमिका सुष्मिता सेन साकारत आहे.सुष्मिता सेनने ‘ताली’चा मोशन पोस्टर शेअर करत कॅप्शन दिले की, ‘लाख गिरा दे बिजली मुझे, मैं तोह सतरंग बनू. मैं ताली बजाती नहीं, बजवाती हूं’. वेबसीरिजचा हा मोशन पोस्टर सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या वेबसीरिजमध्ये गौरी सावंत यांचे पात्र अभिनेत्री सुष्मिता सेन साकारणार आहे. गौरी सावंत यांनी आपल्या आयुष्यात अनेक दु:खांचा सामना केला. पण आज त्या तृतीयपंथीयांच्या उन्नतीसाठी काम करत आहे. सामाजिक कार्यकर्त्या गौरी सावंत एका मुलाखतीत म्हणतात, “मी माझ्या आयुष्याची वेगळी वाट निवडल्याने माझ्या वडिलांनी माझ्यासोबतचे संबंध संपवले. याशिवाय माझ्या वडिलांनी मी जिवंत असताना माझे अंत्यसंस्कारही उरकले.”

सुष्मिता सेनने काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यात तिने वेबसीरिजची शूटिंग पूर्ण झाल्याबद्दल दिग्दर्शक राजीव यांचे आभार मानले. यावर अभिनेत्रीने लिहिले “धन्यवाद, मी अशा दिग्दर्शकांपैकी एक आहे, ते शांत आणि माणूसकी असणाऱ्या दिग्दर्शकांपैकी एक आहे. ‘ताली’ ही वेबसीरिज जिओ सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असून प्रदर्शनाची तारीख अद्याप तरी गुलदस्त्यात आहे. सोबतच लवकरच सुष्मिता ‘आर्या ३’ या वेबसीरिजमध्ये ही ती दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Traffic: मुंबईत तयार होतोय केबल- स्टे ब्रिज, मढ-वर्सोवा दीड तासांचा प्रवास होणार फक्त १० मिनिटांत

Municipal Corporations Election: महापालिकांवर कब्जा, त्याचा मंत्रालयावर झेंडा, 9 महापालिका ठरवणार राज्याचा 'किंगमेकर'

Uddhav- Raj Alliance: ठाकरेंच्या युतीचा मुहूर्त ठरला; भाजप-शिंदेसेनेला टक्कर देण्यासाठी ठाकरे बंधुंची रणनीती काय?

Fact Check : तुमचं व्हॉट्सअॅप हॅक होतंय? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? VIDEO

शिक्षक भरती घोटाळा: आणखी एका शिक्षणाधिकाऱ्याला अटक; 12 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT