Divya Seth Shah Daughter Mihika Shah Dies Saam Tv
मनोरंजन बातम्या

Mihika Shah Dies : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या लेकीचं कमी वयातच निधन, कुटुंबीयांवर कोसळला दु:खाचा डोंगर

Divya Seth Shah Daughter Dies : अभिनेत्री आणि बॉलिवूड अभिनेत्री दिव्या शेठ शाह हिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Chetan Bodke

बॉलिवूड इंडस्ट्रीतून एक दु:खद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध हिंदी टेलिव्हिजन अभिनेत्री आणि बॉलिवूड अभिनेत्री दिव्या शेठ शाह हिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्रीची मुलगी मिहिका शाह हिचे निधन झाले आहे. मिहिकाच्या निधनाचे वृत्त तिच्या आईनेच अर्थात अभिनेत्री दिव्या सेठ शाहने फेसबूकच्या माध्यमातून दिलेले आहे.

अभिनेत्रीच्या जवळच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मिहिकाचे अचानक निधन झालेले आहे. ५ ऑगस्टला तिला ताप आला आणि त्यानंतर तिला हृदयविकाराचा झटका आला. त्यातच मिहिकाचे निधन झाले. मिहिकाच्या निधनामुळे शाह कुटुंबीयांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. फार कमी वयातच मिहिकाचे निधन झाल्यामुळे शाह कुटुंबीय चिंतेत आहे. ८ ऑगस्ट रोजी मिहिकच्या शोकसभेचं आयोजन करण्यात आले आहे. याबद्दलची माहिती तिची आई दिव्या शेठ शाहने स्वत: सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

दिव्या शेठ शाह बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तर तिची आई सुषमा शेठ सुद्धा बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. दिव्याने आपल्या फिल्मी करियरची सुरूवात शाहरूख खानच्या चित्रपटापासून केली आहे. दिव्या किंग खानला आपला अभिनय क्षेत्रातला गुरू मानते. शाहरूखने आणि सुषमा सिंगने 'कभी खुशी कभी गम' चित्रपटात एकत्र काम केले आहे. शाहरूख आणि सुषमा दोघेही चांगले मित्रही आहेत. अनेक चित्रपटांच्या प्रीमियरला त्यांनी एकत्र फोटोही काढले आहेत. किंग खानने आणि दिव्याने दोघांनीही NSD मध्ये एकत्र काम केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पावसात लहानग्यांचे आरोग्य जपण्यासाठी घ्या 'ही' खबरदारी

Shirur News : शेतकरी दाम्पत्याची दोन एकर शेती सातबारावरून गायब; तलाठी व मंडळ अधिकाऱ्याचा प्रताप

Pune : ट्युशनमध्ये मुलाला बेल्ट अन् वह्यांनी बेदम मारहाण, ३५ वर्षाच्या शिक्षिकेवर गुन्हा दाखल

ठाकरे गटाला भाजपचा जबरदस्त धक्का! २ बडे नेते मशाल सोडून कमळ हाती घेणार, कार्यकर्तेही भाजपच्या वाटेवर

Raj Thackeray and Uddhav Thackeray: बाळासाहेबांच्या फोटोसमोर दोन्ही भावांची भेट; राज-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे चर्चा

SCROLL FOR NEXT