Suraj Chavan SAAM TV
मनोरंजन बातम्या

Suraj Chavan : गुलिगत सूरजच्या नव्या घराच्या गृहप्रवेशाचा मुहूर्त ठरला, अजित पवारांनी भरसभेत सांगितली तारीख

Suraj Chavan New House Griha Pravesh Update: 'बिग बॉस मराठी 5' चा विजेता लवकरच आपल्या हक्काच्या घरात गृहप्रवेश करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांनी याबाबत मोठा खुलासा केला आहे.

Shreya Maskar

सध्या सर्वत्र सूरज चव्हाणची (Suraj Chavan) हवा पाहायला मिळत आहे. सूरजने 'बिग बॉस मराठी 5' जिंकून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. 28 ऑक्टोबरला निघालेल्या बारामती विधानसभा मतदार संघाच्या रॅलीमध्ये अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाषण केले. यावेळी सूरज चव्हाण उपस्थित होता. तेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूरज चव्हाणच्या घरासंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे.

अजित पवार सूरज विषयी बोलताना म्हणाले की, "सूरजच्या डोक्यावरून आई-वडिलांचे छत्र गेले, त्यामुळे पाच बहि‍णींनी त्याचा सांभाळ केला आहे. त्याने मोढवेसारख्या गावात राहून शिकायला हवे होते, पण दुर्दैवाने तो शाळेत जाऊ शकला नाही. पण बिग बॉसमध्ये गेला. सगळ्यांवर बॉसगिरी दाखवली आणि अखेर बिग बॉसचा विजेता झाला. सूरजचा बारामती आणि संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान आहे. "

अजित पवार शेवटी म्हणाले की, "आता आपण सर्वांनी मिळून त्याच्यासाठी घर बांधायचे ठरवले आहे. नवा घरचा प्लान त्याला खूप आवडला आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी दिवाळीच्या पहिल्या दिवशी सूरज स्वतःच्या घरात असेल. हा आपला वादा आहे आणि दादांनी शब्द किती खरा असतो, हे अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे. " असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भर सभेत केले.

सूरज चव्हाण हा बारामती मोढवे गावमध्ये राहाणार आहे. झापुक-झुपुक म्हणतं त्यांनी महाराष्ट्राच्या मनावर राज्य केलं आहे. नुकतेच त्याच्या घराचे भूमिपूजन पार पडले आहे. आता लवकरच सूरज आपल्या नवीन घरामध्ये जाणार आहे. त्याचे हे नवीन घर पाहण्यासाठी प्रेक्षकही आतुर आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT