'Bigg Boss 18'च्या घरात पुन्हा राडा, विवियन डिसेना अन् करणवीर मेहरामध्ये कडाक्याचे भांडण

Vivian-Karan Veer : बिग बॉसच्या घरात पुन्हा एकदा करणवीर मेहरा आणि विवियन डिसेना यांच्यात मोठा वाद झाला आहे. हे भांडण नेमकं कशावरून झाल जाणून घ्या.
Vivian-Karan Veer
Bigg Boss 18SAAM TV
Published On

'बिग बॉस 18' (Bigg Boss 18) सध्या चर्चा पाहायला मिळत आहे. रोज एक नवा वाद पाहायला मिळत आहे. बिग बॉसच्या पहिल्या दिवसांपासूनच विवियन आणि करणवीरमध्ये वाद होताना पाहायला मिळत आहे.

आता पुन्हा एकदा विवियन डिसेना ( Vivian Dsena) आणि करणवीर मेहरा ( Karan Veer Mehra) यांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. बिग बॉसने शेअर केलेल्या नवीन प्रोमोमध्ये तुम्ही पाहू शकता की, विवियन डिसेना आणि करणवीर मेहरा मध्ये भांडणे होत आहेत. शिल्पा शिरोडकर, विवियन डिसेना आणि करणवीर मेहरा चर्चा करताना पाहायला मिळत आहे. शिल्पा विवियनला म्हणते की, "तू मेंटॉरशिपची जागा घेतली असशील तर फेअर राहा आणि खेळ" त्यावर विवियन म्हणतो की, "मी काही मेंटॉरशिपची जागा घेतली नाही आहे." यामध्ये करणवीर पडतो आणि बोलू लागतो की, "मला तुझ्याशी बोलायचं आहे" त्यावर विवियन बोलतो की, "मला बोलायचे नाही आहे." त्यावर करण पुन्हा बोलतो की, "तुझं कुटुंब हे सगळं बघत आहे." यावर विवियन बोलतो की, "मी माझा मुद्दा मांडत आहे." अशी तूतू-मैमै या दोघांमध्ये होते.

विवियन डिसेना आणि करणवीर मेहरा भांडणानंतर विवियन अविनाश मिश्रा, ईशा सिंह यांच्याशी बोलताना दिसतो की, "करण सतत कुटुंबाला मधे घेऊन येतो." दुसऱ्या बाजूला करणवीर म्हणतो की, "तो माझा मित्र नाही, मुर्ख माणूस आहे तो."

गेल्या आठवड्यात मुस्कान बामने आणि नायरा बनर्जी यांना बिग बॉसचे घर सोडावे लागले होते. आता या आठवड्यात कोण घराबाहेर जाणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. तसेच 'वीकेंड का वार' सलमान खान करणवीर आणि विवियनची शाळा घेणार का, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

Vivian-Karan Veer
Sai Tamhankar : सई ताम्हणकर अन् अनिशचं नातं तुटलं, अभिनेत्री काय म्हणाली?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com