सूरज चव्हाण संजनासोबत विवाह करणार आहे.
साखरपुडा, हळद आणि लग्नसोहळा हे सर्व कार्यक्रम एकाच दिवशी होतील.
लग्न पुरंदरमधील माऊल गार्डनर हॉलमध्ये पार पडणार आहे.
सूरज चव्हाण यांच्या लग्नपत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे
suraj chavan wedding date and location latest news : बिग बॉस विजेत्या सूरज चव्हाणचे घराचे स्वप्न साकार झाले. सूरजने बारामतीमध्ये अलिशान घर बांधले. आता तो बाशिंग बांधण्यासाठी उतावळा झाला आहेच. साखरपुडा झाल्यानंतर सूरज चव्हाण लग्न कधी करणार? याची उत्सुकता चाहत्यांमध्ये होती. अखेर त्याच्या लग्नाची तारीख, हळदीची वेळ फिक्स झाली आहे. सूरज चव्हाण २९ नोव्हेंबर रोजी बोहल्यावर चढणार आहे. त्याच्या लग्नाची तयारी अंतिम टप्प्यात पोहचली आहे. सूरज चव्हाण पुरंदरचा जावई होणार आहे. सूरज चव्हाण याच्या लग्नाची पत्रिका समोर आली आहे.
सर्वसामान्य घरातून आलेला सूरज आज प्रत्येकाच्या मनावर राज्य करतोय. आपल्या दिलखुलास अन् भोळ्या स्वभावामुळे तो सर्वांचा लाडका झाला. बॉग बिस मराठी स्पर्धा जिंकल्यानंतर सूरजची लोकप्रियता आणखी वाढली. त्याच्या प्रत्येक गोष्टीची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली. आता त्याच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर वाऱ्यासारखी व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांकडून सूरज चव्हाण याला शुभेच्छा दिल्या जात आहेत.
सूरज चव्हाण याचा साखरपुडा, हळदी समारंभ, लग्नसोहळा या सर्व गोष्टी एकाच दिवशी, एकाच ठिकाणी होणार आहेत. सूरज चव्हाण याच्या होणाऱ्या पत्नीचे नाव संजना असे आहे. त्यांच्या लग्नपत्रिकेची पोस्ट व्हायरल होत आहे. shatriya_ramoshi नावाच्या इन्स्टाग्राम खात्यावर ही पत्रिका पोस्ट करण्यात आली आहे.
सूरज चव्हाण याचासाखरपुडा समारंभ २९ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता होणार आहे. तर हळदी समारंभ त्याच दिवळी दुपारी 2 वाजता आणि लग्न संध्याकाळी ६.११ वाजता या शुभ मुहूर्तावर होणार आहे.पुरंदरमधील सासवड-जेजुरी रोड, खळद येथील माऊल गार्डनर हलमध्ये सूरज याचे संजना यांच्यासोबत धुमधडाक्यात लग्न पार पडणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.