Raj Kundra Pornography Case saam tv news
मनोरंजन बातम्या

Pornography Case: पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राचा सुप्रीम कोर्टातून अटकपूर्व जामीन मंजूर, पूनम-शर्लिनलाही दिलासा

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्राला पोर्नोग्राफी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून शर्लिन चोप्रा आणि पूनम पांडे या अभिनेत्रींना मोठा दिलासा मिळाला आहे.

Chetan Bodke

Pornography Case: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्राला पोर्नोग्राफी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. राज कुंद्रासोबत, सुप्रीम कोर्टाने शर्लिन चोप्रा आणि पूनम पांडे या अभिनेत्रींना अश्लील व्हिडीओ बनवून इंटरनेटवर व्हायरल केल्याप्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. सर्व आरोपींनी तपासात सहकार्य करावे आणि गरज पडल्यास तपासात सहभागी व्हावे, असे यावेळी न्यायालयाने सांगितले.

महाराष्ट्र सायबर पोलिसांनी पोर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्रा, शर्लिन चोप्रा आणि पूनम पांडे विरोधात आरोपपत्र दाखल केले होते. राज कुंद्राने मुंबई आणि परिसरात असलेल्या पंचतारांकित हॉटेल्समध्ये अश्लील चित्रपटांचे शूटिंग करत ओटीटी प्लॅटफॉर्मवर करोडोंमध्ये विकल्याचा दावा आरोपपत्रात करण्यात आला होता. राजने पूनम आणि शर्लिनसोबत या अश्लिल व्हिडीओ शूट केल्याची चर्चा होत आहे.

राज कुंद्रा विरोधात आरोपपत्र दाखल झाल्यानंतर त्याच्या वकिलाचे वक्तव्य समोर आले आहे. ही बाब आपल्याला प्रसारमाध्यमांकडूनच कळली असून कायद्यानुसार न्यायालयात हजर राहिल्यानंतर आरोपपत्राची प्रत घेणार असल्याचे वकिलाने सांगितले होते. मिळालेल्या माहितीनुसार आणि एफआयआरमध्ये जे आरोप करण्यात आले आहेत, त्याच्याशी राजचा काहीही संबंध नसल्याचे वकिलाने सांगितले.

राज कुंद्राला गेल्या वर्षी जुलैमध्ये काही मोबाईल अॅप्लिकेशनवरुन अश्लील व्हिडीओ बनवून अपलोड केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. यानंतर तो काही दिवस तुरुंगातही होता. त्यानंतर त्याला सुमारे दोन महिन्यांनी जामीन मिळाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eating Too Fast: घाईघाईत जेवल्याने काय होतं?

Kharadi Rave Party: पार्टीत ड्रग्ज सापडलं..;पुण्यातील रेव्ह पार्टीवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

गाणं लावण्यावरून वाद; शिंदेंच्या नेत्याकडून तरूणावर प्राणघातक हल्ला, काळंनिळं होईपर्यंत मारलं

Maharashtra Live News Update: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण; सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

SCROLL FOR NEXT