Pathan Movie Boycott: शाहरूखचा 'पठान'देखील बॉयकॉट ट्रेंडमध्ये, 'बेशरम रंग'च्या एका सीनमुळं होतेय बंदीची मागणी

२०२२ या वर्षात अनेक बॉलिवूड चित्रपटांना बॉयकॉट करण्यात आले होते.
Pathan Movie Troll
Pathan Movie TrollSaam Tv
Published On

Pathan Movie Boycott: २०२२ या वर्षात अनेक बॉलिवूड चित्रपट ट्रोल झाले आहेत. नेटकरी हे चित्रपटातील दृश्य, कलाकार, चित्रपटाचे कथानक आणि कथेला अनुसरुन नेटकरी चित्रपटाचे भविष्य ठरवतात. याच सर्व गोष्टींचा विचार करत नेटकऱ्यांनी अमिर खानचा लाल सिंह चढ्ढा, रणवीर- आलियाचा ब्रह्मास्र, अक्षय कुमारचा रक्षाबंधन आणि आता शाहरुखचा पठाण चित्रपट ही नेटकरी बॉयकॉट करण्याची मागणी करत आहे.

Pathan Movie Troll
Smita Patil: स्मिता पाटीलचे मेकअपचे रहस्य, 'या' चित्रपटाने केले आत्मनिर्भर...

हा चित्रपट बॉयकॉट करण्याचा मुख्य मुद्दा म्हणजे चित्रपटातील बेशरम रंग (Besharam Rang) या गाण्यात अभिनेत्री दीपिका पादुकोणने (Deepika Padukone) घातलेल्या बिकीनीच्या रंगावरुन बऱ्याच जणांनी आक्षेप घेतला आहे. या चित्रपटावर पहिला आक्षेप भाजप कार्यकर्ते अरुण यादव यांनी घेतला आहे.

Pathan Movie Troll
Smita Patil: न्यूज रिडर ते टॉपची अभिनेत्री; स्मिता पाटील यांनी चाहत्यांच्या मनावर राज्य गाजवलं

भाजप कार्यकर्ते अरुण यादव यांनी बॉयकॉट ट्रेंडचा हॅशटॅग वापरुन 'पठाण' चित्रपटासाठी एक ट्वीट शेअर केले. या ट्वीटमध्ये त्यांनी दीपिका आणि शाहरुख खान यांचा एकत्र असलेला फोटो शेअर केला आहे. या ट्वीटमध्ये अरुण यादव यांनी लिहिले की, 'पठाण चित्रपटात दीपिकाने भगव्या रंगाचे कपडे घातले असून गाण्याचं नाव 'बेशरम रंग' असं ठेवण्यात आलं आहे.'

सोबतच भाजप कार्यकर्ते अरुण जाधव यांच्या ट्वीटला विश्व हिंदू परिषदेच्या प्राची सादवी यांनी रिट्वीट केले आहे. प्राची सादवी रिट्वीटमध्ये म्हणतात की, 'भारतात या चित्रपटाला बंदी आणा. जर तुम्ही या चित्रपटाला बॉयकॉट करत असाल तर रिट्वीट करा.'

पठाण चित्रपटातील बेशरम गाणे हे बी- ग्रेड असल्याचा आरोप एका नेटकऱ्याने केला आहे. त्या नेटकऱ्याने ही चित्रपटाला बॉयकॉट करण्याची मागणी केली आहे.

शाहरुखचा 'पठाण' चित्रपट 25 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हिंदी, तामिळ, तेलुगू भाषेत हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाच्या दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमाच्या माध्यमातून शाहरुख खान चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पुनरागमन करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com