Smita Patil: न्यूज रिडर ते टॉपची अभिनेत्री; स्मिता पाटील यांनी चाहत्यांच्या मनावर राज्य गाजवलं

स्मिता पाटील यांचा जन्म १७ ऑक्टोबर, १९५५ रोजी पुण्यात झाला.
Smita Patil
Smita PatilSaam Tv
Published On

Smita Patil Special: भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये १० वर्षाच्या कारकिर्दीत जर कोणी स्वबळावर प्रसिद्धी मिळवली असेल तर त्या आहेत स्मिता पाटील. जेव्हा त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले तेव्हा त्यांच्या लूकविषयी प्रचंड चर्चा झाली होती. सावळा रंग, बोलके डोळे, चेहऱ्यावरील शांत भाव असा स्मिता पाटील यांचा लूक होता. त्यांनी साकारलेल्या प्रत्येक भूमिकेला त्यांनी न्याय दिला.

Smita Patil
Smita Patil: मॉर्डन विचारांची 'ही' अभिनेत्री जीन्सवर नेसायची साडी; स्मिता पाटीलचे निर्णयही असायचे हटके !

स्मिता पाटील यांचा जन्म १७ ऑक्टोबर, १९५५ रोजी पुण्यात झाला. स्मिता यांचे वडील राजकीय नेते होते तर आई समाजसेविका होत्या. स्मिता अभिनय क्षेत्रात येण्याआधी न्यूज रीडर म्हणून काम करत होत्या. स्मिता FTII पास आऊट होत्या. १९७४ साली आलेला 'मेरे साथ चल' हा ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट त्यांचा पहिला चित्रपट होता. (Celebrity)

स्मिता यांच्या पहिल्या चित्रपटानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिले नाही. पॅरेलल आणि मेन स्ट्रीम सिनेमा दोन्ही प्रकारच्या चित्रपटांमध्ये स्मिता यांनी अनेक भूमिका साकारल्या. तसेच त्यांच्या प्रत्यके भूमिकेला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली. निशांत, मंथन, भूमिका, द नेक्सेलाइट्स, एलबर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है, चक्र, नमक हलाल, बाजार, शक्ति, अर्थ, अर्ध सत्या, मंडी, शराबी, अनोखा रिश्ता, मिर्च मसाला आणि वारिस सारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. (Movie)

१३ डिसेंबर, १९८६ साली त्यांचे निधन झाले. मुलगा प्रतीक बब्बरच्या जन्मदरम्यान निर्माण झालेल्या कॉम्प्लिकेशनमुले त्यांचे निधन झाले. त्या तेव्हा अवघ्या ३१ वर्षाच्या होत्या. त्यांच्या निधनानंतर त्यांचे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले. दहा वर्षाच्या त्यांच्या कारकिर्दीत त्यांना ३ नॅशनल अवॉर्ड, २ फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले होते. तसेच स्मिता यांना भारत सरकारने पद्मश्री देऊन सन्मानित केले होते. (Actress)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com