सुपरस्टार विजयला मिळाली घरात बॉम्ब असल्याची धमकी, पोलिसांचा तपास सुरू Saam Tv
मनोरंजन बातम्या

सुपरस्टार विजयला मिळाली घरात बॉम्ब असल्याची धमकी, पोलिसांचा तपास सुरू

'मास्टर' फेम अभिनेता विजयचे घर उद्ध्वस्त करण्याच्या धमक्या येत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : 'मास्टर' फेम अभिनेता विजयचे घर उद्ध्वस्त करण्याच्या धमक्या येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी १५ नोव्हेंबर दिवशी पहाटे तामिळनाडू राज्य पोलीस मुख्य नियंत्रण कक्षाला एक कॉल आला होता. ज्यात चेन्नईमधील विजयच्या निवासस्थानी बॉम्ब ठेवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस मुख्यालयाने तात्काळ अधिकारी आणि काही धाडसी पोलिसांचे पथक, स्निफर डॉग आणि बॉम्ब निकामी पथकासह विजयच्या निलाकर्णई या निवासस्थानी पाठविण्यात आले आहे.

हे देखील पहा-

मात्र, बॉम्ब शोधक आणि निकामी पथक बीडीडीएस स्निफर डॉग टीमला ही धमकी अफवा असल्याची आढळून आली आहे. याचा अर्थ बॉम्ब नव्हता. चांगली बाब म्हणजे कॉलच्या आधारे शोध घेतल्यावर पोलिसांनी धमकी देणाऱ्या २७ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विल्लुपुरम जिल्ह्यात मार्कनम या ठिकाणी एस भुवनेश्वरन असे या व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विजयच्या व्यवस्थापकाने दिलेल्या तक्रारीच्या आधारावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले की, या व्यक्तीने मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, विरोधी पक्षनेते एडप्पाडी के. पलानीस्वामी आणि अभिनेते रजनीकांत, कमल हासन, अजित कुमार यांना असाच धमकीचा फोन अगोदर करण्यात आला होता. मागील वर्षी देखील विजयच्या सालीग्रामम या ठिकाणी असलेल्या घरावर आणि अभिनेता अजितच्या चेन्नईच्या इंजामबक्कम येथील घरी बॉम्बच्या बनावट धमक्या आले होते.

मोठ्या व्यक्तींना फेक कॉलद्वारे धमक्या देणारा हा इसम भुवनेश्वरन मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. थालपथी विजयच्या वर्कफ्रंटविषयी बोलायचे झाले तर, आजकाल तो नेल्सन दिलीप कुमारच्या बीस्टमध्ये काम करत आहे. जो एप्रिल २०२२ ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात विजयबरोबर पूजा हेगडे देखील दिसणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT