Sunny Deol with Son Karan Deol Instagram @iamsunnydeol
मनोरंजन बातम्या

Sunny Deol's Son Karan Deol Too Marry Soon: सनी देओलने गुपचूप उरकला मुलाचा साखरपुडा; लवकरच अडकणार लग्नबंधनात

Karan Deol Engagement: बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा मुलगा करण देओल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.

Pooja Dange

Sunny Deol's son Karan Deol to marry in June: बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा मुलगा करण देओल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. धर्मेंद्र - प्रकाश कौर यांच्या लग्नाच्या वाढदिवशी करणचा साखरपुडा झाल्याचे सांगण्यात येत आहे. जरा साखरपुडा गपचूप झळा तसेच लग्न देखील अगदी कमी लोकांमध्ये करण्यात येईल असे बोलले जात आहे.

करणच्या रिलेशनशिपविषयी बरीच माहिती अद्याप कळलेली नाही. देओल कुटुंबातील एका जवळच्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार करण आणि त्याच्या होणारी पत्नी दोघे एकमेकांना बऱ्याच काळापासून डेट करत होते. त्या दोघांच्या लग्नाने त्यांचे कुटुंबीय खूप आनंदी आहेत. करणच्या लग्नाची तयारी सुरू झाली आहे.

पिंकविलाने दिलेल्या माहितीनुसार, करण कोणाला डेट करत आहे हे अद्याप समजलेले नाही. त्यांची ही बातमी खासगी ठेवली आहे. दोघांनी एकमेकांना काही काळ डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. (Latest Entertainment News)

धर्मेंद्र आणि प्रकाश कौर यांच्या लग्नाच्या वाढदिवशी करणचा साखरपुडा पार पडला. लग्न समारंभ काही दिवसात आयोजित करण्यात येणार आहे. करणच्या लग्नात देओल कुटुंबाव्यतिरिक्त जवळचे नातेवाईक आणि मित्र परिवार उपस्थित राहणार आहेत.

सनी देओल अन करण देओल यांचे नाते खूप घट्ट आहे, दोघे एकमेकांच्या खूप जवळ आहेत. करण देओल २०१९ साली आलेल्या 'पल पल दिल के पास' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. बॉक्स ऑफिस या चित्रपटाने समाधानकारक कलेक्शन केले होते.

सनी देओल लवकरच 'गदर २'मध्ये दिसणार आहे. ११ ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये अमिषा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. २००१ साली आलेल्या गदर या चित्रपटाचा हा दुसरा भाग आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane Rain Video: ठाण्यात मुसळधार पाऊस! पाण्यासोबत घरात शिरले साप | VIDEO

Maharashtra Rain Live News: कल्याण-कर्जत राज्य महामार्ग पाण्याखाली

कोणत्या जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे हिरड्यांमधून रक्तस्राव होतो?

Baramati Crime News : भेटण्यासाठी बोलावत केले भयानक कृत्य; तरुणाला नग्न करून बेदम मारहाण

शहरात फिरवलं अन् हॉटेलमध्ये नेऊन शारीरिक संबंध; शिवसेनेच्या माजी आमदारावर महिलेचे गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT