Dharmendra - Sunny Deol SAAM TV
मनोरंजन बातम्या

Dharmendra - Sunny Deol: 'बॉर्डर २'च्या टीझर लाँच दरम्यान सनी देओलचं डोळे पाणावले, नेमकं झाल काय? VIDEO

Sunny Deol : सनी देओलच्या 'बॉर्डर २' चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. टीझर लाँच दरम्यान सनी देओल धर्मेंद्र यांच्या आठवणीत भावुक झाला.

Shreya Maskar

सनी देओलच्या 'बॉर्डर २' चित्रपटाचा टीझर रिलीज झाला.

टीझर लाँच कार्यक्रमात सनी देओल धर्मेंद्र यांच्या आठवणीत भावुक झाला.

'बॉर्डर २' चित्रपट 23 जानेवारी 2026 ला रिलीज होणार आहे.

बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'बॉर्डर 2'चा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. मुंबईत भव्य टीझर लाँच कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. टीझर लाँचला वरुण धवन, अहान शेट्टी आणि सनी देओल यांनी उपस्थिती लावली. टीझर लाँच कार्यक्रमात सनी देओलची अनोखी शैली दिसून आली. सनी देओल चित्रपटाचे संवाद बोलताना दिसला. मात्र त्या दरम्यान तो खूप भावुक झाला. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. सनी देओलचा एक भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

'बॉर्डर 2' च्या टीझर लाँच कार्यक्रमादरम्यान सनी देओल हातात माइक घेऊन चित्रपटातील संवाद बोलत होता. त्याचे बोलणे संपण्यापूर्वीच तो भावनिक झाला आणि त्याच्या डोळ्यात अश्रू आले. तो म्हणाला, "आवाज कहां तक जानी चाहिए...लाहोर तक..." असे बोलताच त्याच्या डोळ्यात पाणी आले.

सनी देओल आणि त्याचे कुटुंब गेले काही दिवस कठीण काळातून जात आहे. 24 नोव्हेंबर रोजी ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन झाले. वडीलांच्या निधनानंतर सनी देओल पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी दिसला. वडीलांच्या आठवणीत सनी देओलच्या डोळ्यात अश्रू आले. सनी देओलचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे आणि चाहतेही त्यावर भावनिक प्रतिक्रिया देत आहेत.

'बॉर्डर 2'चित्रपट 23 जानेवारी 2026 ला रिलीज होणार आहे. सनी देओलसोबत वरुण धवन, अहान शेट्टी, दिलजीत दोसांझ, मेधा राणा, मोना सिंग आणि सोनम बाजवा मुख्य भूमिकेत आहेत. अनुराग सिंह यांनी 'बॉर्डर 2' चं दिग्दर्शन केलं आहे. 'बॉर्डर 2' चा टीझर पाहून चाहते चित्रपटासाठी खूपच उत्सुक असल्याचे दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बोगस बियाण्यानंतर बोगस खतांचा साठा जप्त; राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक सुरूच

पुरातून हत्तीने वाचवलं वाघाला? पाठीवर बसवून हत्तीने केली सुटका?

Bihar Politics: राज्यातील भाजपचं सरकार कोसळणार? नितीश कुमारांनी मुख्यमंत्र्यांना फटकारलं, बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

राममंदिरातील चोरीचा पैसा शेअर बाजारात? पोलिसांनी 30 बँक खाती गोठवली?

तुम्ही पिताय भेसळयुक्त दूध? महाराष्ट्रात भेसळमाफियांचा उच्छाद, भेसळमाफियांना होणार थेट मृत्यूदंडाची शिक्षा?

SCROLL FOR NEXT