Sunny Deol And Bobby Deol At Koffee With Karan 8 Saam TV
मनोरंजन बातम्या

KWK 8 New Promo: देओल बंधू लावणार 'कॉफी विथ करण'मध्ये हजेरी; सनी, बॉबी करणार पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफविषयीचे खुलासे

Sunny And Bobby Deol: 'कॉफी विथ करण ८' च्या दुसऱ्या भागात देओल बंधू येणार आहेत.

Pooja Dange

Sunny Deol And Bobby Deol In Karan Johar Chat Show:

'कॉफी विथ करण'चा ८ सीजन सुरू झाला आहे. या सिजनच्या पहिल्या भागाची सुरुवात बॉलिवूडच्या सुंदर रणवीर-दीपिका या कपलने केली. दीपिका - रणवीरमुळे सीजनची सुरुवात दमदार झाली.

'कॉफी विथ करण ८'चा पहिला भाग स्ट्रीम झाल्यानंतर दुसऱ्या भागात कोण येणार याची उत्सुकता प्रेक्षकांना होती. 'कॉफी विथ करण ८' च्या दुसऱ्या भागात देओल बंधू येणार आहेत. नुकताच त्याचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

डिस्नी हॉटस्टार आणि करण जोहर यांनी त्यांच्या सोशल मीडियावर 'कॉफी विथ करण ८' नवीन प्रोमो शेअर केला आहे. प्रोमोमध्ये तुम्ही पाहू शकता करण जोहर, सनी देओल आणि बॉबी देओलचे स्वागत करतो. तसेच शोला सुरुवात करण्याआधी करणने सनी देओलच्या 'गदर २',बॉबी देओलच्या आश्रम आणि अॅनिमलच्या यशासाठी दोघांचे अभिनंदन केले.

'कॉफी विथ करण'च्या नवीन प्रोमोमध्ये करण जोहरने देओल बंधूंना अनेक प्रश्न विचारले आहेत. 'कॉफी विथ करण'मध्ये पहिल्यांदा आलेल्या देओल बंधूंनी अनेक खुलासे केले आहेत. यामध्ये देओल बंधूंच्या पर्सनल आणि प्रोफेशन दोन्ही बाजूंचा समावेश आहे.

'गदर २' ऑरगॅनिक कलेक्शन

करण जोहरने सनी देओलला 'गदर २'विषयी प्रश्न विचारला. 'सनी तू सारखं म्हणत होतास 'गदर २'चे कलेक्शन ऑरगॅनिक आहे. याचा निकम अर्थ काय? आम्ही बॉक्स ऑफिसचे आकडे वाढवून सांगतो का?' असा प्रश्न करणने सनीला केला. याचे उत्तर देत सनी म्हणाला, 'सध्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे वाढवून सांगण्याचा ट्रेंड आहे. त्यामुळे 'गदर २'ची टॅगलाईन 'हिंदुस्तान का असली ब्लॉकबस्टर' होते का?' असे करणने सनी विचारले.

बॉबी देओल करियर

बॉबी देओल त्याच्या करियरविषयी देखील या शोमध्ये बोलणार असल्याचे प्रोमोमध्ये दाखविण्यात आले आहे. सलमान खान बॉबी देओलला म्हणाला होता की, 'जेव्हा माझे करियर व्यवस्थित चालत नव्हते, तेव्हा मी तुझ्या भावाकडे मदत मागितली.' तेव्हा बॉबी देओलने सलमान खानला सांगितले, 'मामू आता मला मदत करा.'

दरम्यान यावेळी बॉबी वडील धर्मेंद्र यांच्या रॉकी वर राणी की प्रेम कहाणी चित्रपटातील (Movie) किसिंग सीनविषयी देखील बोलला. 'कारण जोहर तुझ्या चित्रपटातील हा सीन पाहिल्यानंतर आम्ही पप्पांची खूप मस्करी केली. पण लोकांना ते खूप क्युट वाटलं.' यावर सनी देओल म्हणाला, 'ते माझे वडील आहेत. ते त्यांना जे हवं ते करू शकतात.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raipur Steel plant : स्टील प्लांटमध्ये मोठी दुर्घटना; ६ कामगारांचा मृत्यू, अनेक जण दबल्याची भीती

Maharashtra Live News Update: पुण्यात रस्त्याच्या मागणीसाठी तीन गावातील गावकऱ्यांचे आमरण उपोषण

Amla For Hair: आवळ्याचा केसांवर कोणता परिणाम होतो?

Saturday Horoscope : गोड स्वभावामुळे इतरांना आपलेसे करून घ्याल; मेहनतीनं यश मिळवाल, 'या' ५ राशींच्या लोकांचा दिवस ठरणार खास

Power Block : मध्य रेल्वेवर सर्वात मोठा ८० दिवसांचा पॉवर ब्लॉक! असं असेल ट्रेनचं वेळापत्रक? वाचा

SCROLL FOR NEXT