Govinda-Sunita Divorce: गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्या घटस्फोटाच्या बातम्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या. या जोडप्याने यापूर्वी घटस्फोटाच्या बातम्यांना अफवा म्हणून फेटाळून लावले होते. आता बातमी समोर आली आहे की सुनीता यांनी ५ डिसेंबर २०२४ रोजी वांद्रे फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला होता. या बातमीने गोविंदा आणि सुनीता यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, आता सुनीता यांची एक मुलाखत व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिने तिच्या पतीबद्दलचे प्रेम व्यक्त केले होते.
गोविंदाला माझ्याइतके कोणीही प्रेम करू शकत नाही
खरं तर, सुनीता आहुजा एका मुलाखतीत त्यांच्या ३८ वर्षांच्या संसाराबद्दल आणि गोविंदासोबतच्या तिच्या नात्याबद्दल उघडपणे बोलताना दिसली. सुनीता आहुजा म्हणाल्या, ' मला त्याच्याबद्दल सगळ काही माहिती आहे. त्याला कधी भूक लागले, कधी अपचनाचा त्रास होतो. तो कधी काय आणि कोणता विचार करत असतो. माझ्याइतके गोविंदाला कोणीही ओळखत नाही आणि माझ्यासारखे कोणीही गोविंदावर प्रेम करू शकत नाही.'
हात जोडून ती म्हणाली - परत ये ची-ची
जेव्हा सुनीताला विचारण्यात आले की तिला ९० च्या दशकातील गोविंदा आवडतो की २००० च्या दशकातील? यावर सुनीताने उत्तर दिले, '९० च्या दशकातील. मला तोच गोविंदा आवडतो. जुना गोविंदा.' हात जोडून सुनीताने म्हणाली, 'गोविंदा, परत ये मित्रा. माझ्याकडे परत ये ची-ची.'
प्रेमसंबंधाची चर्चा
वृत्तानुसार, सुनीता आहुजाने हिंदू विवाह कायदा १९५५ च्या कलम १३ (१) (i), (ia), (ib) अंतर्गत घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. अहवालात असा दावा करण्यात आला आहे की सुनीता वेळेवर येते आणि न्यायालयात हजर राहते, तर गोविंदा बेपत्ता आहे. असेही म्हटले जाते की ३० वर्षीय मराठी अभिनेत्रीशी गोविंदाची वाढती जवळीक हे त्यांच्या घटस्फोटामागील कारण आहे. पण, याबद्दल अजून अधिकृत माहिती समोर आली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.