Sunita Ahuja on Govinda: बॉलीवूड अभिनेता गोविंदा सध्या त्याच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत आहे. गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा अनेक मुलाखतींमध्ये तिच्या पतीच्या कथित एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सबद्दल बोलत आहे. एका नवीन मुलाखतीत सुनीता यांनी पुन्हा एकदा तिच्या पतीच्या अफेअर्सवर टीका केली आहे. तिने म्हटले आहे की नवीन अभिनेत्री अनेकदा स्टार्सना फसवतात. परंतु तिने यासाठी गोविंदालाही जबाबदार धरले आहे.
स्ट्रगल करणाऱ्या मुलींना फक्त शुगर डॅडीची गरज असते
सुनीता आहुजाने अलीकडेच मिस मालिनी यांना मुलाखत दिली. गोविंदाच्या अफेअर्सवरील तिच्या मागील कमेंट्सबद्दल विचारले असता सुनीता म्हणाली, "माझी मुले मोठी झाली आहेत. मी नेहमीच त्याला सांगते की या गोष्टीमुळे ते नेहमी डिस्टर्ब होतात. मी नेहमीच त्याला म्हणते की हे तुझं वय नाही. पण त्याला हे खूप चांगलं माहिती आहे की, स्ट्रगल करणाऱ्या आजच्या मुलींना त्यांचा खर्च भागवण्यासाठी शुगर डॅडीची आवश्यकता असते. त्यांना ना रुप ना चेहरा पण हिरोईन व्हायचं आहे. मग काय काही लोक त्यांना फसवतात. ब्लॅकमेल करतात आणि आपलं काम काढण्यासाठी शुगर डॅडी होतात.
तरुणपणी चुका होतात, पण या वयात नाहीत
सुनीता पुढे म्हणाली, "अशा मुली खूप आहेत, पण तू इतकी मूर्ख नाहीस. तू ६३ वर्षांचा आहेस. तुझे चांगलं कुटुंब आहे, एक सुंदर पत्नी आहे आणि दोन मोठी मुले आहेत. ६३ वर्षांच्या वयात तू हे सर्व करू शकत नाहीस. तू हे तुझ्या तरुणपणात करणं ठिक होतं. आपण आपल्या तरुणपणात चुका करतो, पण या वयात नाही."
सुनीता आणि गोविंदा
सुनीता आणि गोविंदाचे लग्न होऊन ३८ वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. त्यांना यशवर्धन आणि टीना ही दोन मुले आहेत. गोविंदाचा मुलगा यशवर्धन लवकरच साजिद खानच्या हॉरर कॉमेडी 'हंड्रेड' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तो 'लापता लेडीज' फेम अभिनेत्री नितांशी गोयलसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.