नवी दिल्ली : कॉमेडियन अभिनेते सुनील पाल नुकतेच एका ऑनलाइन घोटाळ्यात अडकल्यानंतर त्यांचं अपहरण झालं होतं. सुनील पाल यांच्या बेपत्ता झाल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली होती. मात्र, सुदैवाने सुनील पाल पुन्हा घरी परतले. यावेळी त्यांनी मोठा खुलासा केला. किडनॅप करणाऱ्यांनी सुटकेसाठी २० लाखांची मागणी केली होती.
सुनील पाल यांनी म्हटलं की, मी घाबरलो होतो. मला माहीत नव्हतं की, मला कुठे नेलं होतं. त्यांनी मला २० लाख रुपये मागितले होते. मी भीतीपोटी त्यांना २० लाख रुपये नसल्याचे सांगितले. त्यांना १० लाख रुपये देऊ शकतो असे सांगितले. ते एटीएम कार्ड मागत होते. परंतु मी एटीएम कार्ड जवळ ठेवत नसल्याचे सांगितले. त्यानंतर एका गाडीत बसवून ३-४ मित्रांकडून पैसे मागायला सांगितले. त्यांचा व्यवहार कोणासोबत करायचे, याबाबत माहिती समोर आली नाही. त्यांना ६ वाजता १० लाख रुपये हवे होते. जास्तीत जास्त ७.५ लाख रुपये ते ८ लाख रुपये गरज होती'.
अपहरणकर्त्यांनी ७.५ लाख ते ८ लाख रुपये मिळाल्यानंतर सोडून दिल्याचं सुनील पाल यांनी सांगितले. मला विमानलळापर्यंत आणलं होतं, तोपर्यंत माझ्या डोळ्यावर पट्टी होती, असे पाल यांनी सांगितले.
'मला त्यांना सोडायचं होतं. त्यांनी आणताना विमानाने आणलं होतं. तर जातानाही विमानाने सोडलं. त्यांनी माझ्या खिशात २०००० रुपये ठेवले. डोळ्यांना पट्टी बांधून बाहेर बोलावलं. त्यानंतर १०-१२ मिनिटांत निघून जाणार असल्याचं सांगितलं. आम्ही गेल्यानंतरच डोळ्यावरील पट्टी काढण्यास सांगितलं. ते गेल्यानंतर डोळ्यावरील पट्टी उघडली. दिल्लीहून मुंबईला जाणाऱ्या विमानात शिरलो. शेवटच्या विमानाने मुंबईला आलो, असे सुनील पाल यांनी सांगितलं.
सुनील पाल यांनी फिर हेरा फेरी, अपना सपना मनी मनी, बॉम्बे टू गोवा सारख्या अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. २००५ साली द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज शो जिंकल्यानंतर त्यांना भरपूर प्रसिद्धी मिळाली होती.
दरम्यान, सुनील पाल हे कॉमेडियन अभिनेते आहेत. ते बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या पत्नीने पोलिसांत तक्रार दिली होती. मुंबईतल सांताक्रुझ पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यांचा फोन स्विच ऑफ लागत होता, असे त्यांच्या पत्नीने पोलीस तक्रारीत नमूद केले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.