Sulochana Latkar And Ashok Kumar Film Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sulochana Latkar News: अशोक कुमारांचा एक निर्णय, आणि सुलोचना दीदींच्या आयुष्याला मिळाली कलाटणी...

Sulochana Latkar And Ashok Kumar Film: अभिनेते अशोक कुमार आणि अभिनेत्री सुलोचना लाटकर यांनी एका चित्रपटात काम केले असून त्यांनी चित्रपटात सुलोचना दीदींना एक सल्ला दिला होता.

Chetan Bodke

Ashok Kumar One Advise For Sulochana Didi: भारतीय चित्रपटसृष्टीतील सुवर्णकाळाच्या साक्षीदार असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचं वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांना प्रेमाने आणि आदराने ‘सुलोचना दीदी’ असं म्हणायचे. तब्येत बिघडल्यानं सुलोचना दीदी यांना काल संध्याकाळी मुंबईतील सुश्रुषा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने मराठी सिनेसृष्टीने आपली आई गमावल्याची भावना आहे.

मराठी चित्रपटसृष्टीसह हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक चांगल्या भूमिका त्यांनी साकारल्या होत्या. सुप्रसिद्ध अभिनेत्री ठरलेल्या सुलोचना लाटकारांचा प्रवास हा काही इतका ही सोपा नव्हता. अनेक मराठी चित्रपटांमध्ये घरंदाज पात्र साकारल्यानंतर अभिनेत्रीने हिंदी चित्रपटसृष्टीत काम करण्याचं ठरवलं. त्यांना त्यावेळी लोकप्रिय अभिनेते अशोक कुमार यांनी एक सल्ला दिला होता. असा नेमका तो कोणता सल्ला होता?, त्याने त्यांचं आयुष्यच बदललं, नेमकं काय म्हणाले अशोक कुमार?

सुलोचना लाटकरांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये घरंदाज भूमिका साकारल्यानंतर त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. मराठी चित्रपटसृष्टीत दिग्गज अभिनेत्री समजल्या जाणाऱ्या सुलोचना दीदी हिंदी चित्रपटात मोठ्या कलाकारांसोबत काम करायला घाबरायच्या. त्या अशोक कुमार यांच्यासोबत एका चित्रपटात एकत्र करत होत्या. तेव्हा त्या वाक्य बोलताना, अशोक कुमार यांच्या डोळ्यात न बघताच वाक्य बोलू लागल्या होत्या. सीन चालू असतानाच तो सीन थांबवत अशोक कुमार यांनी सुलोचना दीदींना समजावलं.

अशोक कुमार यांनी सुलोचना दीदींना समजावत म्हणतात, “हे असं चालणार नाही. तुम्ही जर माझ्या डोळ्यात न बघताच वाक्य बोलत असाल तर त्याला काहीच अर्थ नाही. वाक्य बोलताना तुम्ही समोरच्या कलाकाराच्या डोळ्यात डोळे घालून बोलणार नाही, तो पर्यंत त्या अभिनयाला किंमत राहत नाही. असं करताना तुम्ही माझी ही अडचण करताय. असं केल्याने मी तुम्हाला काय उत्तर देऊ हेच मला कळत नाही. हे बंद करा. जर तुम्हाला हिंदीमध्ये काम करायचे असेल, इथे काही शिकायचे आहे, तर तुम्हाला डोळ्यात डोळे घालून बोलावं लागेल.”

अभिनेते अशोक कुमार यांच्या त्या वाक्यांनी सुलोचना दीदींना फार मोठा आधार दिला होता. त्यांच्या त्या शब्दांनी सुलोचना लाटकरांचं आयुष्यंच बदललं. एक यशस्वी अभिनेत्री म्हणून मानल्या जाणाऱ्या सुलोचना दीदींनी आपल्या सिनेकारकिर्दित त्यानंतर मागे वळून देखील पाहिले नाही. त्यांनी बिग बींसोबत अनेक दिग्गज सेलिब्रिटींसोबत काम केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: ओळखपत्र,मोबाईल हिसकावला नंतर खांबाला बांधलं; ड्युटीवर निघालेल्या लष्कर जवानासोबत टोल कर्मचाऱ्यांचं संतापजनक कृत्य

Pregnancy Tips : गर्भावस्थेतील मधुमेह नियंत्रणात ठेवणे का आवश्यक आहे?

Pandharpur: डॉल्बीच्या आवाजामुळे एकाचा मृत्यू, दंहीहंडीचा कार्यक्रम पाहायला आला अन्...; पंढरपुरात खळबळ

Hair Loss Remedie : टक्कल पडण्याची समस्या? हे घरगुती उपाय करतील मदत

Rahul Gandhi: व्होट चोरीवरून टोकदार प्रश्न, निवडणूक आयोगानं दिली उत्तरं; तुम्ही समाधानी आहेत का?

SCROLL FOR NEXT