Raja Shivaji  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Raja Shivaji : रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटात 'या' मराठमोळ्या अभिनेत्याची वर्णी, पोस्ट शेअर करत म्हणाला...

Kapil Honrao : रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटात 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेतील अभिनेता झळकणार आहे. त्याने या संबंधित खास पोस्ट सोशल मीडियावर केली आहे.

Shreya Maskar

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh ) सध्या त्याच्या आगामी चित्रपट 'राजा शिवाजी' च्या (Raja Shivaji) शूटिंगमध्ये व्यस्त आहे. नुकतीच या चित्रपटाची रिलीज डेटची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे चाहते चित्रपट पाहण्यासाठी खूपच उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहेत. या चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा जगाला सांगितली जाणार आहे. हा चित्रपट नवीन वर्षात धमाका करणार आहेत. या चित्रपटात तगडी कलाकारांची कास्ट पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात मराठी कलाकार देखील पाहायला मिळणार आहेत.

'राजा शिवाजी' चित्रपटात एका मराठमोळ्या अभिनेत्याची वर्णी लागली आहे. आजवर त्याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. लोकप्रिय मालिका 'सुख म्हणजे नक्की काय असतं' (Sukh Mhanje Nakki Kay Asta ) याचा तो एक भाग राहीला आहे. 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेतील अभिनेता कपिल होनराव याला 'राजा शिवाजी' चित्रपटात काम करण्याची मोठी संधी मिळाली आहे. 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत त्याने 'मल्हार'ची भूमिका साकारली होती. कपिलने इन्स्टाग्राम एक खास स्टोरी टाकून याची माहिती चाहत्यांना दिली आहे.

अभिनेता कपिल होनरावने ( Kapil Honrao) इन्स्टाग्राम 'राजा शिवाजी' चित्रपटाच्या डेट रिलीजचे पोस्टर शेअर केले आहे. तसेच हे पोस्टर स्टोरीला टाकून त्याला हटके कॅप्शन दिलं आहे. त्याने लिहिलं की, "'राजा शिवाजी' चित्रपटाचा मी भाग आहे याचा मला अभिमान आहे... ही संधी मला मिळाली हे माझे भाग्य आहे..." सध्या 'राजा शिवाजी'च्या पोस्टवर चाहत्यांकडून कमेंट्स आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे. तसेत अद्याप कपिल होनरावने चित्रपटात कोणती भूमिका साकारली आहे हे अद्याप उघड झाले नाही आहे.

Kaapil Honrao

'राजा शिवाजी' रिलीज डेट

रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' चित्रपट नवीन वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट 1 मे 2026ला रिलीज होणार आहे. नुकतीच चित्रपटाचे पोस्टर शेअर करून रितेश देशमुखने रिलीज डेट जाहीर केली आहे. हा चित्रपट मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम या सहा भाषांमध्ये पाहता येणार आहे. त्यामुळे चाहते खूपच खुश आहेत.

'राजा शिवाजी' स्टारकास्ट

'राजा शिवाजी' या चित्रपटात रितेश देशमुखसह संजय दत्त, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते आणि जिनिलीया देशमुख यांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भीषण ! डीएसपी रँकच्या २ पोलीस अधिकाऱ्यांच्या अपघातात मृत्यू

Rule Change: LPG गॅस, UPI ते क्रेडिट कार्ड...; १ ऑगस्टपासून ६ नियमांत होणार मोठे बदल

Viral Video : दबक्या पावलांनी आला पण, शिकारी हातातून सटकला; बिबट्याच्या शिकारीचा थरार कॅमेऱ्यात कैद

High Heel Side Effects: सतत हिल सॅन्डल्स घातलताय, होऊ शकतात या समस्या

Kala Vatana Usal: पावसाळ्यात बनवा झणझणीत काळ्या वाटाण्याची उसळ, चव वाढवण्यासाठी वापरा 'ही' खास ट्रिक

SCROLL FOR NEXT