Love Letter Written To Sukesh Jacqueline Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jacqueline Fernandez: ‘तुमच्यासाठी कायपण..!’ जॅकलिनच्या वाढदिवसाला सुकेश चंद्रशेखरने लिहिलं थेट जेलमधून पत्र

सुकेश चंद्रशेखरने जॅकलिन फर्नांडिसला त्याच्या वाढदिवसानिमित्त रोमँटिक पत्र लिहिले आहे.

Chetan Bodke

Love Letter Written To Sukesh Jacqueline: 200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सुकेश चंद्रशेखर सध्या तुरुंगात आहे. अनेकदा तुरुंगातून सुकेशने बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसवरील प्रेम सिद्ध केले आहेत. सुकेशने जॅकलिनवरील प्रेम पुन्हा एकदा जाहीर केले आहे, त्याने सोशल मीडियाच्या प्रेमपत्र लिहीत पुन्हा एकदा आपले प्रेम व्यक्त केले आहे.

सुकेश चंद्रशेखरने जॅकलिन फर्नांडिसला त्याच्या वाढदिवसानिमित्त रोमँटिक पत्र लिहिले आहे. सुकेशने पत्रात लिहिले, “माझी बेबी जॅकलीन, माझी बोम्मा, माझ्या वाढदिवशी मला तुझी खूप आठवण येते. माझ्या सभोवतालची तुझी एनर्जी मिस करतोय. माझ्याकडे सांगण्यासाठी शब्द नाहीत पण मला माहीत आहे की तुझे माझ्यावरील प्रेम कधीच संपणार नाही. तुझ्या सुंदर हृदयात काय आहे तेही मला माहीत आहे. मला कोणत्याही पुराव्याची गरज नाही, माझ्यासाठी ते पुरेसे आहे- बेबी.”

“माझं तुझ्यावर किती प्रेम आहे हे तुला माहीत आहे. तुझं प्रेम माझ्या आयुष्यात तुमची उपस्थिती ही माझ्यासाठी सर्वोत्तम भेट आहे. लव्ह यू माय बेबी, मला तुझे हृदय दिल्याबद्दल धन्यवाद. माझ्या वाढदिवसानिमित्त मला शुभेच्छा देणाऱ्या माझ्या समर्थकांचे आणि कुटुंबीयांचेही मी आभार मानतो. मला शुभेच्छा पत्रे मिळाली, म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो. धन्यवाद, सुकेश चंद्रशेखर.”

सुकेशने जॅकलिनला होळीच्या दिवशी एक पत्र लिहिले होते. त्यावेळी तिला त्या पत्राच्या माध्यमातून होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्या पत्रात सुकेशने लिहिले की, “ होळीच्या सणाच्या दिवशी, मी तुला वचन देतो, जे तुझ्या आयुष्यात रंग फिके झाले असतील किंवा गायब झाले असतील, त्यांना मी पुन्हा तुझ्या आयुष्यात आणण्याचा प्रयत्न करेल. मी सर्व गोष्टींची काळजी घेईन, हीदेखील माझी जबाबदारी आहे. माझे तुझ्यावर प्रेम आहे माझ्या बाळा नेहमी हसत राहा. तू माझ्यासाठी किती महत्त्वाचा आहेस हे तुला माहीत आहे.”

200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सुकेश तुरुंगात आहे. याप्रकरणात जॅकलिनची अनेकदा चौकशीही झाली आहे. तर दुसरीकडे जॅकलिनवर सुकेशकडून अनेक महागड्या भेटवस्तू घेतल्याचा आरोप आहे, तर जॅकलिनच्या वकिलांच्या मते, तिला जबरदस्तीने या प्रकरणात अडकण्यात आले आहे. सुकेशसोबतच्या नात्याबद्दल जॅकलीनने आतापर्यंत अधिकृत काहीही सांगितलेले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jolly LLB 3 : अक्षय आणि अर्शदला पुणे न्यायालयाचा दणका, 'जॉली एलएलबी ३' वादाच्या भोवऱ्यात

Tulsi Kadha Recipe : पावसात भिजल्यामुळे घसा खवखवतोय? पटकन प्या ग्लासभर तुळशीचा काढा

Maharashtra Rain Live News : उल्हास नदीवरील पूल पाण्याखाली; महामार्ग वाहतुकीस बंद

Beed Crime News : "आम्ही सुरेश धसांची माणसं ... ", १२ हजारांच्या वादातून तरुणाचं अपहरण करून मारहाण

Rain Grant Scam : अतिवृष्टी अनुदान घोटाळा; अखेर २८ कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल, २५ कोटींचा अपहार केल्याचा ठपका

SCROLL FOR NEXT