Fans Worried After Sunil Pal Appears Extremely Thin at Film Premiere Saam
मनोरंजन बातम्या

पायात स्लीपर अन् अंगावर साधा शर्ट; कॉमेडी किंगची अशी अवस्था का झाली? Video व्हायरल

Fans Worried After Sunil Pal Appears Extremely Thin at Film Premiere: लोकप्रिय कॉमेडियन सुनील पाल मुंबईतील चित्रपट प्रीमियरमध्ये दिसले. अचानक वजन कमी झाल्याने चाहत्यांचं लक्ष वेधलं, व्हिडिओ व्हायरल.

Bhagyashree Kamble

लोकप्रिय विनोदी कलाकार सुनील पाल अलिकडेच मुंबईत कपिल शर्माच्या 'किस किस को प्यार करू २' या चित्रपटाच्या प्रीमियरमध्ये दिसला होता. या कार्यक्रमाला चारचांद लावण्यासाठी अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते. या इव्हेंटला लोकप्रिय विनोदी कलाकार सुनील पाल देखील उपस्थित होता. सुनील पालने अचानक वजन कमी केल्याने लक्ष वेधून घेतले. या इव्हेंटचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये सुनील पाल निळ्या टी-शर्टमध्ये दिसत आहे. त्यानं काळी पँट आणि चप्पल घातलेली दिसत आहे. याच पेहरावात तो कार्यक्रमात प्रवेश करतो. याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर चाहते चिंतेत पडले आहेत. कारण सुनील पाल यात प्रचंड कमकुवत दिसत आहे.

व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी सुनील पालच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली. 'भाऊ, त्याची प्रकृती सांगत आहे की तो खूप अडचणीत आहे. त्याच्या मित्रांनी त्याला मदत करणं गरजेचं आहे'. सध्या या व्हिडिओद्वारे नेटकऱ्यांनी सुनील पालच्या तब्येतीबाबत चिंता व्यक्त केली आहे.

सुनील पाल व्यतिरिक्त या कार्यक्रमाला टायगर श्रॉफ, अमिषा पटेल, सुनील शेट्टी, कृष्णा अभिषेक, तब्बू, राजीव ठाकूर, आरती सिंग, अनिल कपूर, भारती सिंग, मनोज वायपेयी, अर्चना पूरण सिंग, मनीष पॉल, झाकीर खान, जॉनी लिव्हर आणि सुपरस्टार अभिनेता आमिर खान उपस्थितीत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आहो सुदामे! रीलस्टार अथर्व सुदामेला PMP कडून तिसरी नोटीस, 50 हजारांचा दंड

मुंबईनंतर पुण्यात तुफान राडा; शिंदे गटाच्या दोन गटाच्या २ उमेदवारांवर हल्ला, वडगाव शेरीत दगडफेक

Nashik Accident: नाशिक-पेठ महामार्गावर भीषण अपघात; दोन्ही कारचा चुराडा, ४ जणांचा जागीच मृत्यू, ६ गंभीर जखमी

Thursday Horoscope : स्वभावातला हेकेखोरपणा सोडा, नाहीतर...; ५ राशींच्या लोकांनी राहा सावधान

भाजपचा सत्तेसाठी अकोट पॅटर्न? विचारधारेला तिलांजली; AIMIM शी घरोबा, राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT