Subodh Bhave  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Subodh Bhave Movie: सुबोध भावे प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येतोय संगीतमय ‘मानापमान'; नव्या चित्रपटाची घोषणा

Subodh Bhave : चित्रपट, नाटक, मालिका आणि वेबसीरिज सारख्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर सुबोधने आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवलाय.

Bharat Jadhav

Subodh Bhave Manapamaan Movie :

मराठी अभिनेता सुबोध भावेने आपल्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिलीय. सुबोधने आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केलीय. इस्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करत त्याने याची माहिती दिलीय. सुबोध भावे एका योद्धाची भूमिका साकारलीय. सुबोधचा लूक पाहून चाहत्यांनी कौतुक त्याचे कौतुक करत आहेत. स्वत: सुबोधने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय. (Latest News)

चित्रपट, नाटक, मालिका आणि वेबसीरिज सारख्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर सुबोधने आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवलाय. सुबोधने त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा करुन चाहत्यांचे लक्ष वेधून घेतलंय. ‘मानापमान!’ असं या चित्रपटाचं नाव असून याची निर्मिती जिओ स्टुडिओज् ने केलीय. शंकर-एहसान-लॉय यांनी या चित्रपटाला संगीत दिलंय. या सिनेमात सुबोध कोणाची भूमिका साकारत आहे, हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मराठीतील आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये सुबोधच्या नावाचा समावेश होतो. मराठीमध्ये सर्वाधिक बायोपिक करणाऱ्या अभिनेत्यांमध्ये सुबोधचे नाव घेतलं जातं. सुबोधने यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, बालगंधर्व, काशिनाथ घाणेकर, यांच्यावर आधारित चित्रपटांमध्ये काम केलं आहे. या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाने त्याने चाहत्यांच्या मनावर ठसा उमटवलाय. त्याच्या कट्यार काळजात घुसली, हदयांतर, विजेता, वाळवी, या चित्रपटांना प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिलाय.

नव्या चित्रपटाची घोषणा केल्यानंतर त्याच्यावर चाहत्यांनी त्याचं अभिनंदन केलंय. त्याच्या आगामी प्रोजेक्टसाठी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. काही दिवसांपूर्वी सुबोधचा सजनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यालाही प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यापूर्वी त्यानं प्रसिद्ध अभिनेते नसिरुद्दीन शहा यांच्यासोबत ताज - डिव्हायडेड बाय ब्लड नावाच्या वेबसीरिजमध्ये देखील काम केले होतं. या चित्रपटाच्या शुटिंग सुरू झालं होतं त्यावेळी सुबोध भावेनं सोशल मीडियावर याची एक पोस्ट केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Scenic Train Journey: भारताच्या या ८ रेल्वेतून प्रवास करा अन् स्वर्गसुखाचा आनंद लुटा

Pune Ganeshotsav: विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी 'डीजे'ला परवानगीची गरज नाही, पोलिस आयुक्त काय म्हणाले?

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Cabinet Decisions : मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ मोठे निर्णय; १० जिल्ह्यात 'उमेद मॉल' अन् बरेच काही

Nashik : कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक; अधिकारी न भेटल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कांदे फेकून आंदोलन

SCROLL FOR NEXT