Stree 2 Actor canva
मनोरंजन बातम्या

Stree 2 Actor in Big Boss: 'स्त्री 2'च्या यशानंतर सरकट्याला थेट बिग बॉसचा बुलावा; मुलाखतीत केला मोठा खुलासा

Stree 2 Movie Actor in Big Boss 18 : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या स्त्री २ चित्रपटाने भारताच नाही तर संपूर्ण जगभरात धुमाकूळ घातलाय. स्त्री २ चित्रपटाने जगभरात ५०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. अक्षय कुमार, वरून धवन आणि तमन्ना भाटिया या कलाकारांनी चित्रपटामध्ये कॅमिओ केला आहे. स्त्री २ चित्रपटामधील सरकटाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याची सलमान खानच्या 'बिग बॉस' या शोमधून एंट्री मिळाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या स्त्री २ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. स्त्री २ चित्रपट या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा बॉलिवूड चित्रपट ठरला आहे. स्त्री २ चित्रपटगृहांमध्ये १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला होता. अगदी पहिल्याच दिवसापासून चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. चित्रपटामधील श्रद्धा कपूर, राजकुमार राव, पंकज त्रिपाठी,अपारशक्ती खुराना आणि अभिषेक बॅनर्जी यांच्या अभिनयामुळे स्त्री २ यंदाच्या वर्षाचा सर्वात बेस्ट हॉरर कॉमेडी चित्रपट ठरला आहे. चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसवलं आहे.

स्त्री २ चित्रपटामध्ये अक्षय कुमार, वरून धवन आणि तमन्ना भाटिया या कलाकारांनी कॅमिओ केला आहे. चित्रपटामध्ये चंदेरी गावाची कथा दाखवली आहे. जिथे एक सरकट्या नावाचं भूत गावातील महिलांना त्रास देताना दिसतो. तर श्रद्धा कपूर गावातील महिलांची रक्षा करते. श्रद्धाने या चित्रपटामध्ये डायनची भूमिका साकारली आहे.

चित्रपटामध्ये 'सरकटे'ची भूमिका अभिनेता सुनिल कुमार याने साकारली आहे. सुनिल मुळचा जम्मूचा आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सुनिलला भरपूर प्रसिद्धी मिळालीय. एका मुलाखाती दरम्यान सुनिलने एका गोष्टीचा खूलासा केला. सुनिलला सलमान खानच्या 'बिग बॉस 18'मध्ये सहभागी होण्यासाठी विचारण्यात आले आहे. पिंकविलासोबत झालेल्या मुलाखातीदरम्यान सुनिलने सांगितलं की, "मला बिग बॉस सारख्या रिअॅलिटी शोमध्ये येण्यास रस आहे का असं विचारण्यात आलं होतं. मला ऑक्टोबरमध्ये बिग बॉसमध्ये शो करण्यासाठी विचारलं होतं."

पुढे सुनिल म्हणाला, "मी सध्या पोलीस कॉन्स्टेबल आहे, त्यामुळे मला जास्त दिवस रजा मिळणं खूप कठिण आहे. असा परिस्थितीमध्ये मला बिग बॉसमध्ये सहभागी होण्यासाठी विचार करावा लागेल. माझे वरिष्ठ अधिकारी मला भरपूर सपोर्ट करतात. बिग बॉसमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांच्याकडून मला प्रोत्साहन मिळेल याची मला खात्री आहे." सनिलने यापूर्वी देखील बिग बॉसमध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता आपल्याला बिग बॉस १८ च्या घरामध्ये सुनिल दिसणार म्हणून अनेक प्रेक्षक उत्सुक आहेत.

Edited By: Nirmiti Rasal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT