Stree 2 Box Office Collection CANVA
मनोरंजन बातम्या

Stree 2 Box Office Collection Day 4: श्रद्धा कपूरच्या 'स्त्री २'ने २०० कोटींच्या क्लबमध्ये केली एन्ट्री, चौथ्या दिवशीची कमाई किती?

Shraddha Kapoor and Rajkumar Rao Stree 2 Movie: बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि राजकुमार रावच्या स्त्री २ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धूमाकूळ घातलाय. १५ ऑगस्ट रोजी चित्रपट चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. चित्रपटानं सिनेमागृहामध्ये प्रदर्शित होताच तीन- चार दिवसात सुपरहिट चित्रपटांच्या यादीमध्ये आपलं नाव कोरलंय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor)आणि अभिनेता राजकुमार राव यांचा स्त्री २ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धूमाकूळ घालताना दिसतोय. स्त्री २ (Stree 2) चित्रपटगृहामध्ये १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित करण्यात आला होता. पहिल्या दिवसापासूनच चित्रपटाने प्रेक्षकांचे मन जिंकल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. चित्रपट सिनेमागृहामध्ये प्रदर्शित होताच सुपरहिट चित्रपटाच्या यादीमध्ये पोहोचलाय. पहिल्या दोन ते तीन दिवसांमध्ये स्त्री २ या चित्रपटाने १०० कोटींचा टप्पा गाठत चित्रपटसृष्टीमध्ये नवा विक्रम केल्याचं पाहायला मिळतंय.

प्रेक्षकांना स्त्री २ ची अनेक दिवसांपासून उत्सुकता होती त्या प्रतिक्षेला विरामचिन्ह देत १५ ऑगस्ट रोजी स्त्री २ प्रेक्षकाच्या भेटीला आला. चित्रपटानं पहिल्याचं दिवशी 60.3 कोटींहून अधिक कलेक्शन करत नवा इतिहास रचलाय. श्रद्धाचा स्री २ हा चित्रपट तिसरा सर्वाधीक कमाई करणारा बॉलिवूड चित्रपट ठरलाय. स्री २ हा चित्रपट २०२४चा बेस्ट हॉरर कॉमेडी चित्रपट ठरण्याची शक्यता आहे.

स्त्री २ चित्रपटाच्या चौथ्या दिवसापर्यंतची कमाई २२७ कोटींपर्यंत झाली आहे. प्रेक्षकांमध्ये स्री २ ला घेऊन भरपूर क्रेझ पाहायला मिळत आहे. चित्रपटामधील श्रद्धा आणि राजकुमार राव (Rajkumar Rao) यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. स्त्री २ बॉलिवूडचा दुसरा असा चित्रपट आहे, ज्याने २०० कोटींचा आकडा पहिल्याचं आठवड्यात पार केलाय. स्त्री २ चित्रपटाने अक्षय कुमारच्या ''खेल खेल मै'' आणि जॉनचा ''वेदा'' या चित्रपटांना देखील मागे सोडलं आहे.

स्त्री २ चित्रपटापटामध्ये आपल्याला श्रद्धा कपूर, राजकुमार राव , पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi), अपारक्शित खुराना आणि अभिषेक बॅनर्जी मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. सर्व कलाकारांच्या अ‍ॅक्टिंमुळे आणि त्यांच्या अभिनयामुळे प्रेक्षकांना चित्रपट पाहायला खूप मज्जा येत असल्याचे कळत आहे.

Edited By: Nirmiti Rasal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eating Too Fast: घाईघाईत जेवल्याने काय होतं?

Kharadi Rave Party: पार्टीत ड्रग्ज सापडलं..;पुण्यातील रेव्ह पार्टीवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

गाणं लावण्यावरून वाद; शिंदेंच्या नेत्याकडून तरूणावर प्राणघातक हल्ला, काळंनिळं होईपर्यंत मारलं

Maharashtra Live News Update: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण; सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

SCROLL FOR NEXT