Stree 2 Saam TV
मनोरंजन बातम्या

श्रद्धा कपूरच्या Stree 2 ने तोडले सलमान आणि रणबीरच्या चित्रपटांचे रेकॉर्ड, किती झाली अॅडव्हान्स बुकिंग?

Stree 2 advance booking : बहुप्रतिक्षित स्त्री-2 चित्रपट 15 ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. अनेक रेकॉर्ड तोडायला स्त्री-2 सज्ज झाला आहे.

Namdeo Kumbhar

वैष्णवी राऊत, साम टिव्ही प्रतिनिधी

Stree 2 advance booking : बहुप्रतिक्षित स्त्री-2 चित्रपट 15 ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. अनेक रेकॉर्ड तोडायला स्त्री-2 सज्ज झाला आहे. या चित्रपटाचं प्री-बुकिंगही सुरू झालं आहे. प्री-बुकिंगमध्ये या चित्रपटाने दोन ब्लॉकबस्टर चित्रपटांचे रेकॉर्ड तोडले आहेत. प्री-बुकिंगच्या सुरूवातीच्या 38 तासांतच 'स्त्री'ने सलमान खान आणि रणबीर कपूरच्या चित्रपटांना धोबी पछाड दिला आहे. कोणते आहेत हे चित्रपट?

Sacnilk च्या रिपोर्टनुसार, पीव्हीआर, आयनॉक्स आणि सिनेप्लेक्समध्ये आतापर्यंत 'स्त्री-2'ची 85000 तिकीटं अॅडव्हान्स बुक झाली आहेत. तर देशभरातील चित्रपटगृहांबद्दल सांगायचं झाल्यास 38 तासांत 1.22 लाखांपेक्षा जास्त तिकीटं बुक झाली आहेत. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, या आकड्यांनी सलमान खानच्या 'टायगर 3' आणि रणबीर कपूरच्या 'ब्रम्हास्त्र'चा रेकॉर्ड मोडला आहे. सलमानच्या 'टायगर 3'ची प्री-बुकिंगच्या पहिल्या 38 तासांमध्ये 72000 तिकीटं विकली गेली होती. तर रणबीर कपूरच्या 'ब्रम्हास्त्र'ची पहिल्या 38 तासांमध्ये 65000 तिकीटं विकली गेली होती.

Sacnilk च्या रिपोर्टनुसार, 'स्त्री-2'चे सगळ्यात जास्त तिकीट हे दिल्लीमध्ये विकले जात आहेत. आतापर्यंत दिल्लीमध्ये 'स्त्री-2'ने प्री-बुकिंगमध्ये 1.34 कोटींची कमाई केली आहे. तर महाराष्ट्रात 1.33 कोटी, पश्चिम बंगालमध्ये 60.09 लाख, उत्तर प्रदेशात 51.76 लाख आणि कर्नाटकात 32.09 लाखांची कमाई केली आहे. 'स्त्री-2'चं शूटींग मध्यप्रदेशात झालं आहे, जिथे 19.24 लाख रूपयांचं प्री-बुकिंग झालं आहे.

श्रद्धा कपूर, राजकुमार राव, पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराना अशी भन्नाट स्टारकास्ट असलेल्या 'स्त्री २'चा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. केव्हा एकदाचा 15 ऑगस्ट हा दिवस येतो, याची उत्सुकता 'स्त्री'च्या चाहत्यांना आहे. 'स्त्री २' चा सिक्वेल 2018 मध्ये रिलीज झाला होता. स्त्री हा त्या वर्षातील सर्वात हिट चित्रपटांपैकी एक होता. तब्बल 6 वर्षांनी हा चित्रपट पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

SCROLL FOR NEXT