Tharala Tar Mag Saam Tv
मनोरंजन बातम्या

Tharala Tar Mag: 'ठरलं तर मग'मध्ये अखेर उलगडणार सर्वात मोठं रहस्य; सायलीच आहे खरी तन्वी, मधुभाऊंनी दिला इशारा!

Tharala Tar Mag: ‘ठरलं तर मग’ मालिकेत अखेर सायलीच खरी तन्वी असल्याचा उलगडा होणार आहे. मधुभाऊंच्या इशाऱ्यामुळे साडेतीन वर्षांपासूनचे रहस्य समोर येणार आहे.

Shruti Vilas Kadam

Tharala Tar Mag: स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘ठरलं तर मग’ मध्ये प्रेक्षक गेल्या साडेतीन वर्षांपासून ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण अखेर आता येणार आहे. मालिकेच्या कथानकाचा गाभा असलेला ‘खरी तन्वी कोण?’ हा प्रश्न अखेर सुटणार असून यामुळे मालिकेत मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.

मालिकेत आतापर्यंत प्रिया उर्फ बबली लोखंडे हीच तन्वी असल्याचे भासवून सुभेदार कुटुंबासोबत राहत होती. तिने अनेक वर्षे सर्वांची फसवणूक केली. मात्र तिचे खोटे अखेर उघडकीस आल्यानंतर तिला अटक करण्यात आली. त्यानंतर खरी तन्वी कोण आहे, याचा शोध घेण्याची जबाबदारी सायलीवर येते.

या शोधादरम्यान सायलीला अनेक धक्कादायक गोष्टी समोर येतात. सुभेदारांच्या घरात तिला वारंवार काही भास होऊ लागतात. प्रतिमा आत्यासोबत तिच्या अनेक आवडीनिवडी जुळतात. याशिवाय तन्वीच्या बालपणीच्या आठवणी, तिचा आवाज आणि तिने काढलेली चित्रे यांमधून सायलीला काही महत्त्वाचे धागेदोरे मिळतात. या सर्व गोष्टींमुळे तिला संशय येतो की तीच खरी तन्वी असू शकते. मात्र केवळ संशयावर विश्वास ठेवण्याऐवजी सायलीला सत्य जाणून घ्यायचे असते. त्यामुळे ती मधुभाऊंची भेट घेण्याचा निर्णय घेते. नागराजच्या हल्ल्यानंतर मधुभाऊ अनेक महिन्यांपासून कोमामध्ये आहेत. तरीही सायली त्यांच्याकडे आशेने जाते आणि त्यांना थेट प्रश्न विचारते.

सायली म्हणते, 'मधुभाऊ, तुमचा एक इशारा मला माझ्या कुटुंबापर्यंत पोहोचवू शकतो. मीच खरी तन्वी आहे ना?' असा प्रश्न ती त्यांना विचारते. सुरुवातीला मधुभाऊंकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे निराश झालेली सायली तिथून निघून जाण्याचा निर्णय घेते. परंतु त्याच वेळी अचानक मधुभाऊंच्या धक्क्याने बाजूला ठेवलेला पाण्याचा तांब्या खाली पडतो. हा आवाज ऐकून सायली पुन्हा मागे वळते. ती पुन्हा एकदा तोच प्रश्न विचारते. यावेळी मधुभाऊ डोळ्यांच्या पापण्या उघड बंद करुन तिला 'हो' असा स्पष्ट इशारा देतात.

मधुभाऊंच्या या इशाऱ्यामुळे सायलीला अखेर तिची खरी ओळख समजते. सत्य समोर आल्यानंतर तिचे डोळे पाणावतात. मालिकेतील हा बहुप्रतीक्षित विशेष भाग १५ जून रोजी रात्री ८.३० वाजता प्रसारित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT