Kriti Sanon: कृती सेनॉनने विकले मुंबईतील चार आलिशान फ्लॅट; 8 कोटींपेक्षा जास्त झाला नफा

Kriti Sanon: अभिनेत्री कृती सेनॉन, बहीण नुपूर आणि आई गीता सेनॉन यांनी अंधेरीतील चार अपार्टमेंट्स विकून 8.88 कोटी रुपये कमावले. या व्यवहारातून त्यांना 107 टक्के फायदा मिळाला आहे.
Kriti Sanon
Kriti SanonSaam tv
Published On

Kriti Sanon: बॉलिवूड अभिनेत्री कृती सेनॉन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र यावेळी कारण तिचा चित्रपट किंवा वैयक्तिक आयुष्य नसून तिची रिअल इस्टेट गुंतवणूक आहे. कृती सेनॉन, तिची बहीण नुपूर सेनॉन आणि आई गीता सेनॉन यांनी मुंबईतील अंधेरी पश्चिम भागातील चार अपार्टमेंट्स विकून तब्बल 4.58 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे.

'स्क्वेअर यार्ड्स'ने महाराष्ट्र नोंदणी महानिरीक्षकांच्या संकेतस्थळावरील कागदपत्रांच्या आधारे दिलेल्या माहितीनुसार, या चारही मालमत्तांचे व्यवहार एप्रिल 2026 मध्ये नोंदवण्यात आले. हे सर्व फ्लॅट्स अंधेरी पश्चिममधील प्रीमियम लोकशनवर 'रहेजा क्लासिक'मध्ये आहेत.

माहितीनुसार, गीता सेनॉन यांनी जुलै 2013 मध्ये दोन अपार्टमेंट्स 1.40 कोटी रुपयांना खरेदी केले होते. त्यानंतर जून 2017 मध्ये कृती आणि नुपूरने आणखी दोन युनिट्स 2.90 कोटी रुपयांना विकत घेतले. अशा प्रकारे या चार अपार्टमेंट्सची एकूण किंमत झाली 4.30 कोटी रुपये. सुमारे 9 ते 13 वर्षे या मालमत्ता स्वतःकडे ठेवल्यानंतर सेनॉन कुटुंबाने त्या एकूण 8.88 कोटी रुपयांना विकल्या. यामुळे त्यांना 4.58 कोटी रुपयांचा नफा झाला असून त्यांना 107 टक्के इतका फायदा झाला आहे.

Kriti Sanon
Pranit More : ३७० रुपयांच्या बिर्याणी वादात प्रणीत मोरेला प्रसिद्ध अभिनेत्याचा पाठिंबा; ट्रोलर्सना सुनावले खडेबोल, म्हणाला...

विक्री झालेल्या चार फ्लॅट्सपैकी दोन मोठ्या अपार्टमेंट्सची किंमत प्रत्येकी 3.23 कोटी रुपये होती. या फ्लॅट्सचे बिल्ट-अप क्षेत्र 654.23 चौरस फूट तर कार्पेट क्षेत्र 545 चौरस फूट इतके आहे. प्रत्येक फ्लॅटसोबत पार्किंगची सुविधाही उपलब्ध आहे. या व्यवहारांवर प्रत्येक फ्लॅटचे 19.41 लाख रुपये स्टॅम्प ड्यूटी आणि 30 हजार रुपये नोंदणी शुल्क भरावे लागले. तसेच बाकी दोन लहान अपार्टमेंट्स 1.21 कोटी रुपयांना विकण्यात आले. त्यांचे बिल्ट-अप क्षेत्र 246.06 चौरस फूट आणि कार्पेट क्षेत्र 205 चौरस फूट आहे. या दोन्ही व्यवहारांवर 7.29 लाख रुपये स्टॅम्प ड्यूटी आणि 30 हजार रुपये नोंदणी शुल्क आकारण्यात आले.

Kriti Sanon
Sejal Pawar: KEM कॉलेज चिंदी आहे'; प्रणित मोरेच्या शोमध्ये 'नको ते' बोलणाऱ्या सेजल पवारचा जुना व्हिडिओ व्हायरल

दरम्यान, कृती सेनॉन गेल्या वर्षी मुंबईतील वांद्रे येथील पॉश पाली हिल परिसरात 88 कोटी रुपयांचे आलिशान सी-व्ह्यू डुप्लेक्स पेंटहाऊस खरेदी केल्यामुळेही चर्चेत आली होती. तसेच जुलै 2024 मध्ये तिने अलिबागमध्ये 2,000 चौरस फुटांचा भूखंड खरेदी करून आपल्या रिअल इस्टेट पोर्टफोलिओचा विस्तार केला होता. अलिबागमधील गुंतवणुकीबाबत बोलताना कृतीने शांतता, गोपनीयता आणि दीर्घकालीन गुंतवणूक या दृष्टीने हा निर्णय घेतल्याचे सांगितले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com