Mi Savitribai Jyotirao Phule Saam Tv
मनोरंजन बातम्या

Mi Savitribai Jyotirao Phule: इतिहास, परंपरा आणि भावना; सावित्री-जोतीरावांच्या विवाहातून उलगडणार ऐतिहासिक पर्व

Mi Savitribai Jyotirao Phule Marathi Serial: स्टार प्रवाहवरील ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेत सावित्रीबाई आणि जोतीराव फुले यांच्या ऐतिहासिक विवाहसोहळ्याचं भव्य व भावनिक दर्शन प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Shruti Vilas Kadam

Mi Savitribai Jyotirao Phule Marathi Serial: स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरली आहे. समाजप्रबोधन, स्त्रीशिक्षण आणि परिवर्तनाची प्रेरणा देणारी ही मालिका प्रत्येक भागातून प्रेक्षकांना भावनिकरीत्या जोडून ठेवत आहे. आता या मालिकेत एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक टप्पा प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. सावित्रीबाई आणि जोतीराव फुले यांच्या जीवनातील अत्यंत खास असा विवाहसोहळा लवकरच मालिकेत दाखवण्यात येणार असून, या प्रसंगाकडे प्रेक्षकांचे विशेष लक्ष लागून राहिले आहे.

हा विवाहसोहळा केवळ दोन व्यक्तींच्या आयुष्याचा नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासातील एक महत्त्वाचा क्षण आहे. त्यामुळेच मालिकेच्या निर्मात्यांनी या सोहळ्याची मांडणी अत्यंत भव्य, भावपूर्ण आणि काळाच्या पार्श्वभूमीला साजेशी केली आहे. परंपरा, संस्कार आणि संस्कृती यांचा सन्मान राखत सावित्रीबाई आणि जोतीरावांचा विवाहसोहळा सादर केला जाणार आहे.

खंडोबाला लगीनचिठ्ठी अर्पण करण्याची मंगल परंपरा, मुहूर्तमेढ रोवण्याचा विधी, हळदीचा मंगल समारंभ, चुडा भरण्याचा हळुवार सोहळा अशा प्रत्येक रितीरिवाजाचं अत्यंत बारकाईने चित्रण करण्यात आलं आहे. त्या काळातील दागिने, साड्या आणि विवाहातील प्रत्येक विधीमागील सांस्कृतिक व भावनिक महत्त्वही मालिकेत ठळकपणे अधोरेखित केलं जाणार आहे. या सगळ्या प्रसंगांतून त्या काळातील सामाजिक परिस्थिती आणि सावित्रीबाई-जोतीरावांच्या विचारांची उंची प्रेक्षकांना जाणवेल.

परंपरा आणि भावनांनी नटलेला हा विवाहसोहळा पाहताना प्रेक्षकांच्या डोळ्यांत पाणी येईल आणि मनात अभिमानाची भावना निर्माण होईल, यात शंका नाही. सावित्रीबाई आणि जोतीरावांच्या जीवनप्रवासाची सुरुवात दाखवणारा हा विशेष भाग प्रेक्षकांसाठी नक्कीच अविस्मरणीय ठरणार आहे. तेव्हा हा ऐतिहासिक आणि प्रेरणादायी विवाहसोहळा पाहायला विसरू नका, ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’, दररोज सायंकाळी ७.३० वाजता, फक्त स्टार प्रवाह वाहिनीवर.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Firing: गोळीबाराने धुळे हादरले; राजकमल टॉकीज परिसरात पोलिसांची नाकाबंदी

Bank Strike Postponed: दिलासादायक बातमी! ३ दिवसांचा देशव्यापी बँक संप पुढे ढकलला; IBA आणि बँक संघटनेच्या बैठकीत काय घडलं?

Chanakya Niti : खूप मोठं व्हायचंय? चाणक्यांची ही खास नीती लक्षात ठेवा, सर्व इच्छा होतील पूर्ण

Monday Horoscope : नशिबाची साथ मिळेल! 5 राशींच्या व्यक्तींची होणार चांदी, वाचा सोमवारचे राशीभविष्य

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

SCROLL FOR NEXT