New Marathi Serial  SAAM TV
मनोरंजन बातम्या

New Marathi Serial : मनोरंजनाचा नवा धमाका! ती परत आलीय..., नागिनच्या रुपात कोणती अभिनेत्री? VIDEO नं वेधलं लक्ष

Star Pravah New Marathi Serial : स्टार प्रवाह वाहिनीवर नवीन मालिका सुरू होत आहे. मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मालिका नेमकी काय, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

स्टार प्रवाहवर सुरू होणार नवीन मालिका

मालिकेत दिसणार नागिनची कथा

मालिकेच्या प्रोमोनं वेधलं लक्ष

प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. स्टार प्रवाह वाहिनीवर एक नवीकोरी मालिका सुरू होत आहे. नुकतीच स्टार प्रवाह वाहिनीवर ऐश्वर्या नारकर यांची 'आमच्या लाडक्या नाईक बाई' मालिका सुरू झाली आहे. अशात आता आणखी एका नव्या मालिकेचा प्रोमो समोर आला आहे. या मालिकेतून आपल्याला चमत्कारिक, गूढ आणि रहस्यमय कथा पाहायला मिळणार आहे.

नवीन मालिका

स्टार प्रवाह वाहिनीवर सुरू होणाऱ्या नवीन मालिकेचे नाव 'मी कात टाकली' असे आहे. नागपंचमी सणाचे औचित्य साधून 'मी कात टाकली' मालिकेच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. मालिकेच्या प्रोमो व्हिडीओत भर पावसात जंगलातून एक नागिन सरपटत जाताना दिसत आहे. तर दुसऱ्या एका पोस्टमध्ये मालिकेच्या मुख्य अभिनेत्री आणि अभिनेता मुहू्र्ताची पाटी घेऊन उभे दिसत आहे, मात्र त्यांचे चेहरे अद्याप गुलदस्त्यात ठेवले आहे. मालिकेचा प्रोमो पाहता मालिका नाग विश्वावर आधारित असल्याचे बोले जात आहे.

सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे की, नागराज आणि नागराणीच्या रुपात कोण कोणते कलाकार झळकणार. मालिकेची रिलीज डेट आणि तारीख उद्याप स्पष्ट झालेली नाही. तसेच मुख्य कलाकार आणि इतर कलाकारांची नावेही समोर आलेली नाही. मात्र प्रेक्षक या नव्याकोऱ्या मालिकेसाठी खूपच उत्सुक आहे.

एकीकडे नवीन मालिका येत असताना आता अजून कोणती मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार ही चर्चा देखील इंटरनेटवर पाहायला मिळत आहे. अलिकडेच अभिनेत्री समृद्धी केळकरची 'हळद रुसली कुंकू हसलं' या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेच्या पाठोपाठ मराठी अभिनेत्री पूजा बिरारीची 'येड लागलं प्रेमाचं' ही मालिकाही संपली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT