Mahesh Babu  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Mahesh Babu : हातात त्रिशूल घेऊन नंदी बैलावर स्वार; महेश बाबूचा 'रुद्र' अवतार, पाहा VIDEO

Mahesh Babu first look In SSMB29 : एस.एस.राजामौली यांच्या SSMB29 चित्रपटाचे नवीन नाव घोषित करण्यात आले आहे. तसेच चित्रपटातील महेश बाबूचा फर्स्ट लूक समोर आला आहे.

Shreya Maskar

एस.एस. राजामौली यांच्या 'SSMB29' चित्रपटात प्रियंका चोप्रा आणि महेश बाबू झळकणार आहे.

चित्रपटातील महेश बाबूचा फर्स्ट लूक समोर आला आहे.

'SSMB29' चित्रपटाचे नवीन नाव घोषित करण्यात आले.

प्रसिद्ध दिग्दर्शक एस.एस.राजामौली (SS Rajamouli) आगामी चित्रपट 'ग्लोबट्रोटर' (Globetrotter) मुळे चर्चेत आहेत. या चित्रपटात साऊथ सुपरस्टार महेश बाबू (Mahesh Babu) आणि बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा झळकणार आहे. SSMB29 पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहे. प्रियंका चोप्रानंतर आता महेश बाबूचा चित्रपटातील फर्स्ट लूक समोर आला आहे. तसेच चित्रपटाचे नवीन नाव देखील ठेवण्यात आले आहे.

हैदराबादमधील रामोजी फिल्म सिटीमध्ये शनिवारी संध्याकाळी SSMB29 मोठा सोहळा पार पडला. यात चित्रपटाचे शीर्षक घोषित करण्यात आले. एस.एस.राजामौली यांच्या चित्रपटाचे नाव 'वाराणसी' ठेवण्यात आले. या सोहळ्याला चित्रपटातील मुख्य कलाकार महेश बाबू, प्रियांका चोप्रा आणि पृथ्वीराज सुकुमारन यांनी हजेरी लावली. तसेच 'वाराणसी' चित्रपटातील महेश बाबू यांचा फर्स्ट लूक समोर आला आहे.

महेश बाबूच्या फर्स्ट लूकचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. जो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. महेश बाबू हातात त्रिशूल धरून नंदी बैलावर स्वार झालेला दिसत आहे. त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच आग पाहायला मिळत आहे. पार्श्वभूमीत मंदिरे दिसतात. त्याचा रुद्र अवतार प्रेक्षकांच्या भलताच पसंतीस पडला आहे. 'वाराणसी' चित्रपट रामायणाशी जोडला गेला आहे.

चित्रपटात महेश बाबूचे नाव 'रुद्र' असे आहे. 'वाराणसी' हा टाइम ट्रॅव्हलर ॲडव्हेंचर चित्रपट आहे. एस.एस.राजामौली यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या चित्रपटाच्या पोस्टरला हटके कॅप्शन देण्यात आले आहे. त्यांनी लिहिलं की, "वाराणसीमध्ये 'रुद्र' म्हणून महेश बाबू..." चाहते चित्रपटासाठी खूप उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहेत. चाहते आणि कलाकारमंडळी या पोस्टवर भरभरून कमेंट्स करत आहे. कौतुक करत आहे. तसेच चित्रपटासाठी शुभेच्छा देत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Methi Thepla Recipe: घरच्या घरी सोप्या पद्धतीने मऊ मेथीचे थेपले कसे बनवायचे?

Sindhudurg Travel : हिरवा निसर्ग हा भवतीने! आंबोलीजवळ 'हे' आहे भटकंतीसाठी अनोखं ठिकाण

Shocking : "तू कुठेतरी जाऊन मर..." पत्नीच्या अपमानाला कंटाळून पतीने केली हत्या; कुऱ्हाड उचलली अन्...

Top Google Searches 2025: रोहित-कोहली नाही तर भारतीयांनी या खेळाडूला केलं गुगलवर सर्वाधिक सर्च; IPL मुळे होता चर्चेत

Maharashtra Live News Update : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात थंडीच्या तीव्र लाटेचा इशारा

SCROLL FOR NEXT