Splitsvilla 16 Makers Send Legal Notice To Diksha Pawar Diksha Pawar
मनोरंजन बातम्या

MTV Splitsvilla फेम अभिनेत्रीचा मोठा खुलासा; निर्मात्यांवर केले बॉडी शेमिंगचे गंभीर आरोप

Diksha Pawar: MTV स्प्लिट्सव्हिला 16 मधील अभिनेत्री दीक्षा पवारने निर्मात्यांवर बॉडी शेमिंग आणि मानसिक त्रासाचे आरोप केले आहेत. स्पॉयलर्स लीक केल्यानंतर तिला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे.

Shruti Vilas Kadam

Diksha Pawar : लोकप्रिय रिअॅलिटी शो MTV स्पिट्सव्हीला पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. शोमधील स्पर्धक आणि अभिनेत्री दीक्षा पवारने शोच्या निर्मात्यांवर गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. दीक्षाने निर्मात्यांकडून आपले बॉडी शेमिंग करण्यात आल्याचा आरोप केला असून, या प्रकरणामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दीक्षा पवारने सोशल मीडियावर ‘स्प्लिट्सव्हिला 16’चे काही स्पॉयलर्स शेअर केले होते. यानंतर शोच्या निर्मात्यांनी तिच्यावर कायदेशीर कारवाई करत नोटीस पाठवली. मात्र, या नोटीसमुळे आपण घाबरणार नसल्याचे दीक्षाने स्पष्टपणे सांगितले आहे.

दीक्षाने तिच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये शोच्या टीमवर गंभीर आरोप केले. “'मेकर्सना असं वाटतंय की मला नोटीस पाठवली तर मी घाबरून जाईन. तुम्ही ज्याला बॉडी शेम करत आहात तर, मी सांगते MTV काय आहे. शोमध्ये मी जे केलं त्याबद्दल ते काहीही बोलू शकतात. पण मी जे केलं ते दाखवायला हवं.” असा मत तिने व्यक्त केलं. तिने असा आरोपही केला की शोमध्ये तिने केलेल्या चांगल्या गोष्टी मुद्दाम दाखवल्या गेल्या नाहीत.

याचबरोबर, रिअॅलिटी शोमध्ये स्पर्धकांच्या मानसिक आरोग्याची पुरेशी काळजी घेतली जात नसल्याचाही आरोप दीक्षाने केला आहे. “टीआरपीसाठी स्पर्धकांना ट्रोल केलं जातं,” असेही ती म्हणाली. तिच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये आणि प्रेक्षकांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी दीक्षा पवारने शोच्या फायनलिस्टबाबत स्पॉयलर्स दिल्यामुळे चाहत्यांकडूनही तिच्यावर टीका करण्यात आली होती. अनेकांनी शोची उत्सुकता कमी केल्याचा आरोप तिच्यावर केला होता. सध्या या संपूर्ण प्रकरणावर शोच्या निर्मात्यांकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली तरी ‘स्प्लिट्सव्हिला 16’शी संबंधित हा वाद मनोरंजनविश्वात चर्चेचा विषय ठरला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhatrapati Sambhaji Maharaj: छत्रपती संभाजी महाराजांचं हस्ताक्षर पाहिलंय का? दानपत्रात छत्रपती शिवाजी महाराजांचाही उल्लेख

Maharashtra News Live Update: पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर, बदलापुरात राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याचा बैलगाडीतून पालिकेपर्यंत प्रवास

आंब्याचा राजा आपल्या कोकणतला; तोतापुरी, केशर अन् दशहरी आहेत तरी कुठले?

Shocking : धक्कादायक! हॉटेलमधील कर्मचारी महिलेचे अंघोळ करताना फोटो काढले, धमकी देऊन मालकाने अत्याचार केला

Kolhapur : बॉयफ्रेंड फोन उचलत नाही, कोल्हापुरातील संतापलेल्या मुलीने जे केलं, त्याने पोलीसही चक्रावले

SCROLL FOR NEXT