Toxic Release Date yandex
मनोरंजन बातम्या

Toxic Release Date : अखेर तारीख ठरली! 'टॉक्सिक' चित्रपट 'या' डेटला होणार प्रदर्शित

Yash Movie Toxic : सुपरस्टार यशचा 'टॉक्सिक' चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे. चित्रपट कधी प्रदर्शित होणार जाणून घेऊयात.

Shreya Maskar

साऊथ अभिनेता यशचा (South Superstar Yash) मोठा चाहता वर्ग आहे. तिने अनेक सुपरहिट चित्रपटांतून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. सध्या यश त्याच्या बहुप्रतिक्षित 'टॉक्सिक' (Toxic) चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. अलिकडेच रिलीज झालेल्या चित्रपटाच्या टीझरमुळे चाहते चित्रपट पाहण्यासाठी आतुर झाले आहेत. चित्रपटात यश एका खास अंदाजात पाहायला मिळत आहे.

अखेर आता 'टॉक्सिक' चित्रपटाची रिलीज डेट (Toxic Release Date) समोर आली आहे. यामुळे यशच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. यशचा 'टॉक्सिक' चित्रपट पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या रिलीजची डेट यशने सोशल मीडियावर पोस्टर शेअर करून दिली आहे. 'टॉक्सिक' चित्रपट पुढील वर्षी मार्च महिन्यात रिलीज होणार आहे.

'टॉक्सिक' चित्रपट प्रदर्शनाची तारीख

'टॉक्सिक' चित्रपट प्रदर्शनाची तारीख 19 मार्च 2026 आहे. हा चित्रपट इंग्रजी आणि कन्नडमध्ये एकाच वेळी चित्रित केला जात आहे. तर हिंदी, तेलुगू, तमिळ आणि मल्याळम भाषांमध्ये डब केला जाणार आहे. 'टॉक्सिक' चित्रपटाचे दिग्दर्शन गीतू मोहन दास आणि निर्माते वेंकटनारायण आणि यश आहे.

'टॉक्सिक' चित्रपटात तगडी स्टारकास्ट दाखवण्यात आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, चित्रपटात नयनतारा, हुमा कुरेशी, तारा सुतारिया, आणि कियारा आडवाणी या अभिनेत्री पाहायला मिळणार आहे. तर अच्युत कुमार आणि अक्षय ओबेरॉय हे अभिनेते देखील झळकणार आहेत. साऊथ अभिनेता यशला रॉकी भाई, रॉकिंग स्टार या नावाने सिनेसृष्टीत ओळखला जाते. त्याच्या अभिनयाचे चाहते दिवाने आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cricket Match Explosion: क्रिकेट मॅच सुरू असताना भीषण स्फोट, संपूर्ण स्टेडिअम हादरले; एकाचा मृत्यू तर अनेक जण गंभीर

Ganpati Visarjan: गणेश विसर्जनाला गालबोट, गणरायाला निरोप देताना चौघे नदीत बुडाले; दोघांचा मृत्यू

Maharashtra Politics: कोकणात ठाकरे गटाला भलं मोठं खिंडार; विश्वासू समर्थकांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'

Ganesh Visarjan 2025 : माझ्या बाप्पाला घेऊन जाऊ नका; निरोप देताना चिमुकलीला अश्रू अनावर, VIDEO

Maharashtra Politics : एवढा पैसा कुठून आला काका? मंत्री सरनाईकांच्या टेस्ला कार खरेदीवर मराठी अभिनेत्याचा सवाल

SCROLL FOR NEXT