
Salman Khan: मूव्हीज, टीव्ही शोज आणि सेलिब्रिटीजवरील माहितीचा जगातील सर्वांत प्रसिद्ध व विश्वसनीय स्रोत असलेल्या IMDb ने 2025 च्या सर्वाधिक बहुप्रतीक्षित भारतीय चित्रपटांच्या यादीची घोषणा केली. जगभरातून IMDb वर दर महिन्याला येणा-या 25 कोटींहून अधिक विजिटर्सच्या वास्तविक पेज व्ह्यूजनुसार ही यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत प्रथम स्थान मिळाले आहे सलमान खानच्या सिकंदर या चित्रपटाला.
सर्वाधिक बहुप्रतीक्षित भारतीय चित्रपटांच्या यादीमध्ये क्र. 1 वर असलेला सलमान खानचा सिकंदर या चित्रपटाचे दिग्दर्शक ए. आर. मुरुगदोस म्हणाले, “2025 च्या IMDb च्या सर्वाधिक बहुप्रतीक्षित भारतीय चित्रपटांच्या यादीमध्ये सिकंदर पहिल्या स्थानी बघून मला अतिशय आनंद झाला आहे. सलमान खानसोबत काम करणे हा एक उत्तम अनुभव होता. त्याच्या मेहनतीमुळेच सिकंदर जीवंत झाला आहे. हा चित्रपट घडवून आणल्याबद्दल साजिद नाडियदवालाचे खूप धन्यवाद.
2025 चे IMDb चे सर्वाधिक बहुप्रतीक्षित भारतीय चित्रपट
या चित्रपटात सिकंदरसह टॉक्सिक, कूली, हाऊसफुल 5, बाग़ी 4, राजा साब, वॉर 2, L2: एंपुरान, देवा, कन्नप्पा या चित्रपटांचा पहिल्या १ ० बहुप्रतीक्षित चित्रपटांच्या यादीत समावेश केला आहे. त्यानंतर रेट्रो, ठग लाईफ, जाट, स्काय फोर्स, सितारे जमीन पर, थामा, कंतारा ए लीजंड: चॅपटर 1, अल्फा, थांडेल या चित्रपटांचा यादीत समावेश आहे. याचाच अर्थ यावर्षी प्रदर्शित होणाऱ्या अनेक चित्रपटांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.
विशेष म्हणजे या यादीतील 20 टायटल्सपैकी 11 हिंदी आहेत, तीन तमिळ व तेलुगू आहेत, दोन कन्नड आणि एक मल्याळम चित्रपट आहे. ह्या यादीतील तीन चित्रपटांमध्ये अक्षय कुमार प्रमुख भुमिकेत असलेला हाऊसफुल 5, कन्नाप्पा आणि स्काय फोर्स आणि रश्मिका मंदानासुद्धा तितक्याच चित्रपटांमध्ये आहे सिकंदर, छावा आणि थामा. मोहनलाल, प्रभास, पूजा हेगडे आणि कियारा अडवानी प्रत्येकी दोन चित्रपटांतील भुमिकांमध्ये आहेत. या यादीतील पाच टायटल्स प्रसिद्ध फ्रँचायजीचे सीक्वेल्स किंवा भाग आहेत: हाऊसफुल 5, बाग़ी 4 , वॉर 2, सितारे ज़मीं पर, आणि कंतारा ए लीजंड: चॅपटर 1.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.