Thalapathy Vijay Saam Tv
मनोरंजन बातम्या

Thalapathy Vijay ची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांचा राडा, अभिनेत्याच्या आलिशान कारच्या काचा फुटल्या; VIDEO व्हायरल

Thalapathy Vijay Video: थलापती विजयला पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी त्याच्या कारच्या काचा फुटल्याची आणि कारचे मोठे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. थलापती विजयचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

Priya More

Thalapathy Vijay Car Damaged By Fan:

साऊथचा सुपरस्टार थलापती विजयचा (Thalapathy Vijay) मोठा चाहतावर्ग आहे. थलापती विजयची एक झलक पाहण्यासाठी त्याचे चाहते खूपच उत्सुक असतात. थलापती विजय ज्या-ज्या ठिकाणी जातो त्याठिकाणी चाहते त्याच्या भोवती मोठी गर्दी करतात. नुकताच थलापती विजय केरळमध्ये (Kerala) गेला होता. त्याठिकाणी त्याला पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी त्याच्या कारच्या काचा फुटल्याची आणि कारचे मोठे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. थलापती विजयचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

थलापती विजय सध्या त्याचा आगामी चित्रपट लिओच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या शूटिंगसाठी तो केरळमध्ये गेला होता. यावेळी त्याला पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती. चाहत्यांनी यावेळी त्याच्या कारला घेराव घातला. यावेळी अभिनेत्याच्या कारच्या काचा फुटून त्याचे मोठे नुकसान झाले. या घटनेचा व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

थलापती विजयच्या चाहत्यांचे त्याच्यावर असलेले प्रेम नेहमीच दिसून आले आहे. पण सध्या जी घटना घडली आहे ही थलापती विजयला देखील आवडली नसावी. ई टाइम्सच्या वृत्तानुसार, थलपती विजय त्याचा आगामी चित्रपट 'ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम'च्या क्लाइमॅक्स सिन्सच्या शूटिंगसाठी केरळमधील तिरुवंनतनरम येथे दाखल झाला होता. जवळपास १४ वर्षांनंतर अभिनेता या शहरामध्ये पोहचला होता. त्यामुळे त्याला पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली. त्याच्या टोयाटो कारला चाहत्यांनी घेराव घातला. यावेळी त्याच्या कारच्या काचा फुटल्या.

सुदैवाने या घटनेमध्ये थलापती विजय जखमी झाला नाही. चाहत्यांची गर्दी पाहता शेवटी थलापती विजय कारच्या सनरुफमध्ये आला आणि चाहत्यांना भेटला. 'ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम' या चित्रपटाद्वारे तो प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर आला होता. त्यानंतर त्याच्या चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळाली. या चित्रपटाची रिलीज डेट अद्याप समोर आली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्यात बदली एक्सप्रेस सुसाट! 6 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या

Maharashtra News Live Update: बारामतीत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; नागरिकांची धावपळ

OTT Weekend List: वीकेंडला पार्टनरसोबत घरी निवांत वेळ घालवायचा आहे का? मग पाहा या 7 रोमँटिक वेब सीरिज

TCS धर्मांतरण प्रकरणात धक्कादायक खुलासा! पीडित तरुणीला दाखवले व्हिडिओ, मौलाना कनेक्शन उघड

Maratha Reservation: मोठी बातमी! मराठा समाजासाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, OBC प्रमाणे ८ योजनांचा मिळणार लाभ

SCROLL FOR NEXT