Shilpa Shetty: ही तर उर्फीची बहीण..., हटके ड्रेसिंग स्टाइलमुळे शिल्पा शेट्टी झाली ट्रोल

Shilpa Shetty Trolled: नवनवीन ड्रेसिंग स्टाइल आणि लूकमध्ये शिल्पा शेट्टी फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. नुकताच तिने पोस्ट केलेल्या नव्या फोटोशूटमुळे ती ट्रोल झाली आहे. हे फोटो पाहून नेटकऱ्यांनी तिची तुलना उर्फीसोबत केली आहे.
Shilpa Shetty Trolled
Shilpa Shetty TrolledSaam Tv

Shilpa Shetty Stylish Look:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) चित्रपटांसोबतच वेब सीरिजमध्ये दमदार काम करत आहे. शिल्पा शेट्टी तिच्या प्रोफेशनल लाईफसोबतच तिच्या पर्सनल लाईफमुळे देखील चर्चेत असते. शिल्पा शेट्टी आपल्या जबरदस्त फिटनेस आणि टोंड फिगरमुळे चांगलीच चर्चेत असते. नेहमी सोशल मीडियावर शिल्पा शेट्टी फिटनेसचे व्हिडीओ पोस्ट करत असते. त्याचसोबत नवनवीन ड्रेसिंग स्टाइल आणि लूकमध्ये शिल्पा शेट्टी फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. नुकताच तिने पोस्ट केलेल्या नव्या फोटोशूटमुळे ती ट्रोल झाली आहे. हे फोटो पाहून नेटकऱ्यांनी तिची तुलना उर्फीसोबत केली आहे.

शिल्पा शेट्टीने नुकताच 'स्टाइल आइकॉन अवार्ड्स 2024' या शोमध्ये हजेरी लावली. या शोमध्ये सहभागी झाल्यानंतर शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर लोकप्रिय झाली. या अवॉर्ड शोमधील शिल्पा शेट्टीच्या लूकची चांगलीच चर्चा झाली. शिल्पा शेट्टीने आपल्या हटक्या लूक आणि फॅशन सेन्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शिल्पा शेट्टीची ड्रेसिंग स्टाइल पाहून सर्वजण तिच्याकडे पाहतच राहिले. शिल्पा शेट्टीच्या या लूकमधील फोटो आणि व्हिडीओ सध्या चर्चेत आले आहेत. शिल्पा शेट्टीच्या चाहत्यांना तिचा लूक आवडला. पण नेटकऱ्यांनी तिला ट्रोल देखील केले आहे.

शिल्पा शेट्टीने ब्लॅक कलरचा गाऊन परिधान केला होता. तिने कमरेवर प्लास्टिकची एक्सेसरीज घातली होती. शिल्पा शेट्टीचा हा लूक पाहून अनेकांना उर्फी जावेदची आठवण झाली. शिल्पा शेट्टीने लाइट मेकअप, मोकळे केस आणि हाय हिल्स कॅरी करत आपला लूक परिपूर्ण केला होता. शिल्पा शेट्टी या लूकमध्ये खूपच हॉट दिसत होती. शिल्पा शेट्टीने या लूकमध्ये पापाराझींना अनेक पोझ दिल्या. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शिल्पाचे हे फोटो पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. शिल्पा शेट्टीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर देखील हे फोटो शेअर केले आहेत.

शिल्पा शेट्टीच्या नवीन लूकचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर कमेंट करताना अनेकांनी शिल्पा शेट्टीची उर्फी जावेदसोबत तुलना केली. कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, 'असे दिसते की या ड्रेसची प्रेरणा उर्फी जावेदकडून घेतली गेली आहे'. तर दुसऱ्या युजरने लिहिले की, 'राज कुंद्राच्या उर्वरित फेम मास्कमधून ड्रेस बनवला आहे'.

दरम्यान, शिल्पा शेट्टीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, शिल्पा शेवटी रोहित शेट्टीच्या 'इंडियन पोलिस फोर्स' या ॲक्शन सीरिजमध्ये दिसली होती. ज्यामध्ये तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि विवेक ओबेरॉय मुख्य भूमिकेत आहेत. ही सीरिज 19 जानेवारी रोजी OTT प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झाली होती. या वेबसीरिजला प्रेक्षकांनी चांगली पसंती दिली.

Shilpa Shetty Trolled
Rupali Ganguli: 'अनुपमा'च्या आयुष्यात पुन्हा येणार आनंद?, रुपाली गांगुलीच्या फोटोवरून होतेय चर्चा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com