Latha Rajinikanth Saam Tv
मनोरंजन बातम्या

Latha Rajinikanth: सुपरस्टार रजनीकांतची पत्नी अडचणीत, लतावर फसवणुकीचे आरोप; म्हणाली - 'सेलिब्रेटी असल्याची किंमत मोजावी लागते'

Priya More

South Superstar Rajinikanth:

साऊथ सुपरस्टार रजनीकांत (Superstar Rajinikanth) आपल्या चित्रपट आणि स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असतात. पण यावेळी रजनीकांत नाही तर त्यांची पत्नी लता चर्चेत आल्या आहेत. यामागचे कारण म्हणजे 'कोचादाइयां' या तमिळ चित्रपट. या चित्रपटाशी संबंधित फसवणूक प्रकरणामुळे त्या चर्चेत आल्या आहेत. या फसवणूक प्रकरणात लता यांना बंगळुरू न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

मंगळवारी अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाने लता रजनीकांत यांना १ लाख रुपये आणि २५,००० रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. लता रजनीकांत यांनी त्यांच्यावर केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. 'सेलिब्रिटी असल्याची ही किंमत मोजावी लागत आहे', असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

लता रजनीकांत यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावत सांगितले की, 'माझ्यासाठी हे एका लोकप्रिय व्यक्तीचा अपमान, छळ आणि शोषणाचे प्रकरण आहे. सेलिब्रिटी असल्यामुळे मला ही किंमत मोजावी लागत आहे. सेलिब्रिटी असल्यामुळे प्रकरण मोठे नसले तरी बातमी खूप मोठी होते. ही कोणतीही फसवणूक नाही. आमची प्रतिमा डागाळण्याचे हे फक्त एक षडयंत्र होते. ज्यातून माझी सुटका झाली आहे.'

चेन्नईस्थित अ‍ॅड ब्युरो अ‍ॅडव्हर्टायझिंग प्रायव्हेट लिमिटेडने २०१४ च्या चित्रपटाच्या हक्कांसाठी त्यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. तक्रारकर्त्याने दावा केला होता की, 'त्यांनी चित्रपटाच्या निर्मात्यांपैकी एक असलेल्या मीडिया वनला १० कोटी रुपये दिले होते आणि लता रजनीकांत यांनी हमीदार म्हणून साइन केले होते.'

लता रजनीकांत यांनी असे सांगितले की, ज्या पैशाबद्दल बोलले जात आहे त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही. हे मीडिया वन आणि संबंधित लोकांच्यामधील प्रकरण आहे. त्यांनी आधीच तडजोड केली आहे आणि हे संपूर्ण प्रकरण त्यांच्यामध्ये आहे. हमीदार म्हणून मी खात्री केली की त्यांना पैसे दिले गेले आहेत. यानंतर या प्रकरणामध्ये मला गुंतवण्यात आले.'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sri Lanka Tourism : श्रीलंकेत मनसोक्त आणि कमी खर्चात फिरता येणार; कसं वाचा संपूर्ण डिटेल्स

IOCL Recruitment: इंडियन ऑइलमध्ये अधिकारी होण्याची संधी; या पदासाठी सुरु आहे भरती; वाचा संपूर्ण माहिती

Nandurbar News : नंदुरबार दंगल..दगडफेक करणाऱ्या ४० जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात; शहरात तणावपूर्ण शांतता

Manoj Jarange Patil: उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती खालावली; मनोज जरांगेंचा उपचार घेण्यास नकार

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

SCROLL FOR NEXT