17 Year Girl Molestation Case
17 Year Girl Molestation CaseSaam Tv

Actor Arrested : 17 वर्षीय मुलीच्या विनयभंग प्रकरणी प्रसिद्ध चित्रपट निर्माता आणि अभिनेत्याला अटक

DN Nagar Police Station: डीएननगर पोलिस ठाण्यात (DN Nagar Police Station) या प्रकरणी गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहेत.
Published on

Film Actor And Producer Arrested:

सिनेसृष्टीतून (Film Industry) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीला चित्रपटात काम देण्याचे आमिष दाखवून तिचा विनयभंग केल्याची घटना मुंबईमध्ये घडली आहे. याप्रकरणी गुजराती चित्रपटांमध्ये (Gujarati Movie) काम करणारा अभिनेता आणि निर्मात्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डीएननगर पोलिस ठाण्यात (DN Nagar Police Station) या प्रकरणी गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईमधील डीएननगर पोलिसांनी मंगळवारी एका ४० वर्षीय गुजराती चित्रपट अभिनेता आणि निर्मात्याला विनयभांगाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. या चित्रपट निर्मात्याने १७ वर्षीय मुलीला चित्रपटामध्ये काम देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर त्याने तिचा विनयभंग केला. याप्रकरणी पीडित मुलीने डीएननगर पोलिस ठाण्यात चित्रपट निर्मात्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.

17 Year Girl Molestation Case
Salman Khan Birthday: ३५ वर्षांपासून 'टायगर' करतोय बॉलिवूडवर राज्य, पहिल्या चित्रपटासाठी मिळालं होतं फक्त इतकं मानधन

पीडित मुलगी गुजराती आहे. तर आरोपी चित्रपट निर्माता आणि अभिनेता देखील गुजारतचा आहे. तो सध्या अंधेरीमध्ये राहतो. आरोपीची पीडित मुलीच्या काकांशी ओळख होती. आपल्याला चित्रपटात काम करण्याची संधी मिळेल या आशेने मुलीने आरोपीसोबत ओळख करून घेतली. त्यानंतर सोमवारी आरोपीने पीडित मुलीला अंधेरीतील एका हॉटेलच्या खोलीमध्ये बोलवले. याठिकाणी एकट्या मुलीला पाहून आरोपीने फायदा घेत तिचा विनयभंग केला.

17 Year Girl Molestation Case
Actor Arrested : 17 वर्षीय मुलीच्या विनयभंग प्रकरणी प्रसिद्ध चित्रपट निर्माता आणि अभिनेत्याला अटक

या घटनेनंतर घाबरलेल्या मुलीने थेट डीएननगर पोलिस ठाण्यात धाव घेतली. आरोपीविरोधात तिने तक्रार दाखल केली. अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनंतर डीएननगर पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४ (विनयभंगाच्या उद्देशाने हल्ला) आणि POCSO (संरक्षण), ८ (लैंगिक अत्याचार) अतंर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. डीएननगर पोलिस याप्रकरणाचा तपास करत आहेत.

17 Year Girl Molestation Case
Salaar Collection: 'सालार'ची फक्त बॉक्स ऑफिसच नाही तर जगभरात धमाकेदार कमाई, ५ दिवसांत केले इतके कलेक्शन

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com