Mahesh Babu Saam Tv
मनोरंजन बातम्या

Mahesh Babu: अभिनेता महेश बाबूची वडिलांना अनोखी श्रद्धांजली!, ४० विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची घेतली जबाबदारी

Priya More

Mahesh Babu Big Decision:

साऊथचा सुपरस्टार महेश बाबू (Mahesh Babu) आणि त्याचे कुटुंब नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. आपल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याने सिनेसृष्टीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. महेश बाबूने साऊथ फिल्म इंडस्ट्रीला अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.

महेश बाबूच्या फक्त प्रोफेशनल लाईफचीच नाही तर त्याच्या पर्सनल लाईफची देखील खूप चर्चा होत असते. सध्या सोशल मीडियावर महेश बाबूचा एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो आणि त्याची पत्नी नम्रता शिरोडकर (Namrata Shirodkar) महेश बाबूच्या दिवंगत आई-वडिलांना श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत.

महेश बाबूचे वडील अभिनेते कृष्णा यांचे निधन होऊन एक वर्ष झाले आहे. वडिलांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त अभिनेता आणि त्यांच्या कुटुंबीयांनी हैदराबाद येथे कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात अभिनेत्याच्या आई-वडिलांचे स्मरण करण्यात आले. वडिलांच्या पुण्यतिथीच्या दिवशी अभिनेत्याने मोठा निर्णय घेतला आहे. अभिनेत्याने एनजीओच्या ४० मुलांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.

महेश बाबूने वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त गरीब मुलांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. महेश बाबू आणि त्यांची पत्नी नम्रता शिरोडकर यांनी 2020 मध्ये महेश बाबू फाउंडेशनची स्थापना केली होती. ज्यामध्ये त्यांनी हृदयाशीसंबंधित आजार असलेल्या मुलांच्या उपचारात मदत करण्याचा विचार केला होता. अशातच आता अभिनेत्याने आपल्या वडिलांना श्रद्धांजली म्हणून आपल्या ट्रस्टमध्ये सुपरस्टार कृष्णा शैक्षणिक निधीची स्थापना केली आहे. या माध्यमातून तो ४० गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करणार आहे. ज्यामध्ये मुलांचे शाळा ते पदवीपर्यंतचे शिक्षण असेल.

महेश बाबूचे वडील अभिनेते कृष्णा यांचे १५ नोव्हेंबर २०२२ रोजी वयाच्या ८० व्या वर्षी हैदराबाद येथे निधन झाले होते. त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. पहिल्या पुण्यतिथीनिमित्त आपल्या वडिलांचे स्मरण करताना अभिनेत्याने ट्विटरवर त्यांचा जुना फोटो शेअर केला आणि लिहिले की, 'One year of missing you...Superstar, always and forever'. महेश बाबू आणि त्यांच्या पत्नी व्यतिरिक्त अशोक गल्ला, शरण कुमार आणि महेशच्या बहिणी या कुटुंबातील इतर सदस्य कृष्णा यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाला उपस्थित होते.

महेश बाबूकडे अनेक चित्रपट आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तो चित्रपट निर्माते त्रिविक्रम श्रीनिवास आणि एसएस राजामौली (SS Rajamouli) यांच्या चित्रपटांमध्ये काम करत आहे. त्रिविक्रम श्रीनिवासच्या 'गुंटूर कारम'च्या (Guntur Kaaram) स्क्रिप्ट आणि कलाकारांमध्ये आतापर्यंत अनेक बदल करण्यात आले आहेत. पुढील वर्षी संक्रांतीला हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cancer Screening Device : आता एका मिनिटात होणार कॅन्सरचं निदान, IIT कानपूरने बनवलं एक खास डिव्हाईस

Arbaz-Nikki : तुझं बाहेर लफडं असेल, अरबाजला भेटताच निक्की काय म्हणाली? VIDEO होतोय व्हायरल

Make Soap at Home : तांदळाच्या पिठापासून घरच्याघरी बनवा अंघोळीचा साबण; स्किन ग्लो करेल आणि चमकू लागेल

Marathi News Live Updates : रेल्वेच्या MPT मशीन एकमेकांना धडकल्या; चार कर्मचारी जखमी

Rock Salt Uses: उपवासाच्या दिवशी सैंधव मीठाचा वापर का केला जातो?

SCROLL FOR NEXT