Allu Ramesh Passed Away Saam Tv
मनोरंजन बातम्या

Allu Ramesh Passed Away: दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर शोककळा; अभिनेते अल्लू रमेश यांचं निधन

Allu Ramesh Passed Away: तेलुगू चित्रपट निर्माते आनंद रवी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अल्लू रमेश यांच्या निधनाची माहिती दिली.

साम टिव्ही ब्युरो

Allu Ramesh Passed Away : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून अत्यंत दु:खद बातमी समोर येत आहे. तेलुगू सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते अल्लू रमेश यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. वयाच्या 52 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. अल्लू रमेश यांच्या निधनाने दाक्षिणात्या सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

तेलुगू चित्रपट निर्माते आनंद रवी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अल्लू रमेश यांच्या निधनाची माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार, कार्डिअॅक अरेस्टमुळे विशाखापट्टनम येथील त्यांच्या घरी अल्लू रमेश यांचं निधन झालं आहे. (Entertainment News)

अल्लू रमेश यांचा करिअर

अल्लू रमेश यांनी आपल्या करिअरची सुरुवात थिएटरपासून केली. 'चिरुजल्लू' या चित्रपटातून टॉलीवूडमध्ये पदार्पण केलं आणि जवळपास 50 चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. त्यांच्या 'टोलू बोम्मलता,' 'मथुरा वाईन्स,' 'वेधी,' 'ब्लेड बाबजी,' 'नेपोलियन' आणि 'केरिंथा' या भूमिका प्रचंड गाजल्या होत्या. (Bollywood News)

अलीकडेच त्यांनी 'मां विडाकुलू' या प्रसिद्ध वेब सीरिजमध्ये मुख्य अभिनेत्रीच्या वडिलांची भूमिका केली होती. कॉमिक टायमिंगमुळे अल्लू रमेश यांची फॅन फॉलोईंग मोठी होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story : कोरडवाहू शेतकर्‍याचा मुलगा झाला अधिकारी! MPSC मध्ये महाराष्ट्रात टॉप १० मध्ये, अख्खा गावात जल्लोष

CM Devendra Fadnavis: रखडलेल्या प्रकल्पांवरुन मुख्यमंत्र्यांचा अधिकाऱ्यांवर संताप; शांत, संयमी फडणवीसांचा रुद्रावतार

Bhagavad Gita: तुम्हाला क्रोध येण्याचं खरं कारण माहितीये का? श्रीकृष्णांचं भगवद्‌गीतेतील गूढ उत्तर जाणून घ्या

Maharashtra Live News Update: निलेश घायवळवर आणखी एक मोक्का, तरुणावर केला होता कोयत्याने हल्ला

Amitabh Bachchan : पैसाच पैसा! बिग बींनी मुंबईतील 2 लग्जरी फ्लॅट्स विकले, नफा वाचून थक्क व्हाल

SCROLL FOR NEXT