SRK Completes Shooting Of Atlee's Jawan: २०२३ हे वर्ष शाहरुखसाठी फारच खास असणार आहे. त्याचे या वर्षात एकूण तीन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. शाहरुखच्या ‘पठान’ ने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. अशातच त्याच्या पुढील चित्रपटाची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे, तो चित्रपट म्हणजे, ‘जवान’. हा चित्रपट जून महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाची शूटिंग पूर्ण झाली आहे.
‘जवान’ची घोषणा झाल्यानंतर अनेकदा चित्रपटाच्या सेटवरील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. बहुप्रतिक्षित आणि बिगबजेट चित्रपट असणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन एटली यांनी केले आहे. नुकतंच काल शाहरुख आणि दीपिका पदूकोण यांच्यावर एक गाणं चित्रपटासाठी चित्रित केल्याची बातमी समोर आली. दीपिकाचा कॅमिओ यात आपल्याला पाहायला मिळणार आहे.
पीपिंग मूनने दिलेल्या वृत्तानुसार, शाहरुखने त्याचा बिगबजेट असलेला चित्रपट ‘जवान’च्या शूटिंग दरम्यान एक वेगळाच विक्रम रचला आहे. आजवर सर्वाधिक दिवस चित्रित करण्यात आलेला शाहरुखचा हा पहिला चित्रपट असल्याचं सांगितलं जात आहे. ‘जवान’चं चित्रिकरण जवळपास १८० दिवस होतं. सप्टेंबर २०२१ मध्ये चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली असून पुणे, हैद्राबाद, चेन्नई अशा वेगवेगळ्या शहरात चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करण्यात आले. (Entertainment News)
लॉकडाऊनमुळे चित्रपटाच्या शूटिंगसाठी बराच वेळ लागला. शिवाय अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट जून मध्ये न प्रदर्शित होता ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता वर्तवली जात होती.
नुकतंच चित्रपटाची शूटिंग पूर्ण झाली असून जूनमध्ये चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. अद्याप चित्रपटाचं डबिंग, व्हीएफएक्स आणि पोस्ट प्रोडक्शनचं सगळंच काम बाकी असून हा चित्रपट जूनमध्ये प्रदर्शित होईल की नाही याची माहिती अद्याप तरी गुलदस्त्यातच आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिग्दर्शकांनी चित्रपटाच्या ट्रेलरचे आणि टीझरवर काम करण्याची सुरुवात केली आहे. चित्रपटाचा टीझर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. सोबतच लवकरच चित्रपटाच्या प्रमोशनची ही सुरुवात होणार आहे. (Bollywood News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.