Rajinikanth To Quit Acting Career Instagram
मनोरंजन बातम्या

Rajinikanth To Quit Acting Career: रजनीकांत सिनेसृष्टीतून घेणार निवृत्ती?; ‘या’ चित्रपटातून घेणार चाहत्यांची रजा...

वयाच्या ७२ व्या वर्षी रजनीकांत यांनी आपला अभिनय एका तरुण अभिनेत्याला लाजवेल असा कायम जरी ठेवला असला तरी, ते सिनेसृष्टीतून निवृत्ती घेणार असल्याची चर्चा होत आहे.

Chetan Bodke

Rajinikanth Quit Acting Industry: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार रजनीकांत नेहमी आपल्या आभिनायामुळे चर्चेत असतात. फक्त दाक्षिणात्य सिनेसृष्टीतच नाही तर बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा डंका सर्वत्र वाजवणारे रजनीकांत यांच्या चित्रपटाची नेहमीच चर्चा होते. आपल्या सिनेकारकीर्दीत Tollywood सह बॉलिवूडमध्येही थलैवा स्टारने यशस्वी चित्रपट दिले. वयाच्या ७२ व्या वर्षी रजनीकांत यांनी आपला अभिनय एका तरुण अभिनेत्याला लाजवेल असा कायम जरी ठेवला असला तरी, ते सिनेसृष्टीतून निवृत्ती घेणार असल्याची चर्चा होत आहे.

लोकेश कनगराज दिग्दर्शित ‘Thalaivar 171’ मध्ये रजनीकांत लवकरच शूटिंग करिता जाणार आहेत. रजनीकांत यांचा ‘जेलर’ हा १६९ वा चित्रपट असून त्यानंतर रजनीकांत आपल्या मुलीच्या ‘लाल सलाम’ या चित्रपटात एक महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत, हा चित्रपट त्यांचा १७० वा चित्रपट ठरेल. (Tollywood)

अद्याप याची अधिकृत घोषणा झाली नसून लवकरच याची अधिकृत घोषणा होईल. पण सध्या रजनीकांत यांचे चाहते एका गोष्टीमुळे नाराज आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, लोकेश कनगराज दिग्दर्शित ‘Thalaivar 171’ या चित्रपटानंतर रजनीकांत सिनेसृष्टीतून निवृत्ती घेण्याची शक्यता आहेत. तमिळ अभिनेता आणि दिग्दर्शक मिस्किन यांनी ही माहिती दिली असून त्यांच्या या विधानामुळे सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा होत आहे.

एका मुलाखतीमध्ये लोकेशविषयी बोलताना मिस्किन म्हणाले, “लोकेश खूप चांगला दिग्दर्शक आहे. देशभरात त्याच्या चित्रपटांची नेहमीच चर्चा होते. लोकेशच्या आगामी चित्रपटात रजीनकांत दिसणार आहेत. सध्या अशी चर्चा आहे की, लोकेश दिग्दर्शन करत असलेला चित्रपट रजनीकांत यांचा शेवटचा असेल, यात किती तथ्य आहे ते मला माहीत नाही. पण आज ५० वर्ष या क्षेत्रात काम केलेल्या सुपरस्टारने लोकेशसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली असून लोकेशसाठी ही बाब अत्यंत अभिमानाची आहे.”

रजनीकांत यांनी नेल्सन दिलीपकुमार दिग्दर्शित आगामी ‘जेलर’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. या चित्रपटात तो एका मिशनवर असलेल्या जेलरची भूमिका साकारत आहे. यात मोहनलाल, शिव राजकुमार आणि जॅकी श्रॉफ यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. रम्या कृष्णन, योगी बाबू, वसंत रवी, विनायकन यांच्याही यात महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट या ऑगस्टमध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. यानंतर सुपरस्टारने जय भीम फेम दिग्दर्शक टीजे ज्ञानवेलसोबत त्याच्या पुढील चित्रपटाची घोषणा केली. रिपोर्ट्सनुसार, चियान विक्रम या चित्रपटात व्हिलनच्या भूमिकेसाठी चर्चेत असल्याचे बोलले जात आहे.

अजून तरी, रजनीकांत यांच्याकडून किंवा त्यांच्या जवळच्या व्यक्तीकडून रजनीकांत यांच्या निवृत्तीच्या बातमीला दुजोरा दिलेला नाही. रजनीकांत यांना लोकेश कनगराज यांच्या चित्रपटात पाहण्यासाठी सर्वच उत्सुक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : निश्चितच मी विजय होईल- झिशान सिद्दीकी

Horoscope Today: कोणत्या राशींसाठी आजचा दिवस असेल भाग्यशाली, वाचा राशीभविष्य

Maharashtra Election Results : कोण मुख्यमंत्री, कोण आमदार! विधानसभा निवडणूक निकालाआधीच झळकले विजयाचे बॅनर

IND vs AUS : पहिल्या सामन्यात मार्नस लाबुशेनकडून चिटींग? मोहम्मद सिराज संतापला, वादात कोहलीचीही उडी, पाहा Video

Maharashtra Assembly Election Result : धाकधूक अन् टेन्शन वाढलं! १०० मतदारसंघात काटें की टक्कर, काहीही होऊ शकतं, कोण ठरणार किंगमेकर?

SCROLL FOR NEXT