Rahul-Disha Share Good News: राहुल वैद्य-दिशा परमारने शेअर केली गुड न्यूज; सोनोग्राफीचा व्हिडिओ देखील केला शेअर

Rahul Vaidya-Disha Parmar: राहुल आणि दिशा लवकरच आई-बाबा होणार आहेत.
Rahul Vaidya-Disha Parmar Announce Pregnancy
Rahul Vaidya-Disha Parmar Announce PregnancyInstagram @rahulvaidyarkv

Rahul Vaidya-Disha Parmar Announce Pregnancy: गायक राहुल वैद्य आणि अभिनेत्री दिशा परमार यांनी एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. राहुल आणि दिशा लवकरच आई-बाबा होणार आहेत. दोघांनीही त्यांच्या फॅन्ससोबत ही गुड न्युज शेअर केली आहे.

दिशा परमारने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट केली आहे. दिशेने शेअर केलेल्या पोस्टमधील फोटोमध्ये राहुल वैद्य हातात पाटी घेऊन आहे दिशा परमारने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आहे. त्या पाटीवर लिहिले आहे, 'मम्मी आणि डॅडी.' या फोटोमध्ये दिशा परमारचा बेबी बंपही दिसत आहे. (Latest Entertainment News)

Rahul Vaidya-Disha Parmar Announce Pregnancy
Hruta Durgule Romantic Post: मी अशीच कल्पना केली होती... पॅरिसमधील रोमँटिक फोटो शेअर करत हृताला पतीने दिल्या लग्नाच्या शुभेच्छा

तसेच दिशा आणि राहुलने सोनोग्राफीचा फोटो आणि व्हिडीओही शेअर केला आहे. ज्यामध्ये बाळ हालचाल करताना दिसत आहे. या पोस्टसोबत दिशा परमारने लिहिले आहे, 'पालक आणि बाळाकडून नमस्कार.'

दिशा परमारच्या या पोस्टवर चाहते अनेक कमेंट करत आहेत. तसेच सेलिब्रिटीही त्यांचे अभिनंदन करत आहेत. जस्मिन भसीन, अनिता हसनंदानी, भारती सिंग, मौनी रॉय, अली गोनी आणि राजीव अडातिया यांनीही राहुल वैद्य आणि दिशा परमार यांचे अभिनंदन केले.

राहुल वैद्यला लग्नानंतर लवकर वडील व्हायचे होते आणि अखेर त्याची ही इच्छा आता पूर्ण होणार आहे. राहुल वैद्यने 2021 मध्ये चाहत्यांसोबत ट्विटर सेशनमध्ये ही इच्छा व्यक्त केली होती. तसेच राहुलने मला मुलगी हवी असल्याचे सांगितले होते. मुली बेस्ट असतात, असेही राहुल म्हणाला होता.

राहुल वैद्यने 16 जुलै 2021 रोजी दिशा परमारशी लग्न केले. राहुलने 'बिग बॉस 14' मध्ये दिशाला प्रपोज केले होते. लग्नापूर्वी राहुल आणि दिशा परमार एकमेकांना डेट करत होते, पण त्यांनी आपले नाते सर्वांपासून लपवून ठेवले होते. दिशा परमारने एका मुलाखतीत राहुल वैद्यसोबत तिची लव्ह स्टोरी कशी सुरू झाली हे सांगितले होते.

त्यावेळी दिशा परमार म्हणाली की, मला राहुलचे एक गाणे खूप आवडले होते आणि त्यावर 'लव्ह इट' अशी कमेंट केली होती. दिशा परमार 'बडे अच्छे लगते हैं 2' या टीव्ही शोमध्ये काम करत होती. पण काही कारणास्तव तिने शो मध्येच सोडला आणि नंतर हा शो बंद झाला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com